कृषी बातम्याकृषी सल्ला

यंदा, आंबेमोहराचा फुलला ‘मळा’! पण आंब्यालाच लागलेली, उतरती कळा. पहा: आंबा गळती रोखण्यासाठी काय उपाय योजना हवी…

यंदाच्या हवामानामध्ये सातत्याने बदल झाल्यामुळे व मध्येच अधून मधून थंडीचे प्रमाण वाढल्याने, यावर्षी आंब्याच्या झाडाला पुन्हा मोहोर सुरू झाला आहे. त्यामुळे, झाडाकडून फळांना अन्न पुरवठा होत नाही. मोहर लागल्यामुळे झाडाच्या अन्नाचे विभाजन झाल्याचे दिसते. त्यामुळे झाडावरून फळ गळती होण्यास सुरू झाल्याचे चित्र दिसते. अशावेळी शेतकरी मित्रांनी काय करावे? फळगळतिची स्थिती रोखण्यासाठी नवीन आलेले आंब्याचा मोहर शक्यतो काढून टाकावा.

यावर्षी आंब्याला मोहर चांगला असला तरी, तापमानवाढीमुळे आंब्याच्या झाडाला संयुक्त फुलांचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यामुळे आंबा उत्पादनात निश्‍चित वाढ होईल. परंतु आंब्याच्या झाडाला प्रमाणापेक्षा जास्त फळे लागल्यास, फळे पोसली जाणार नाहीत. अशावेळी काय केले पाहिजे? कॅल्शियम नायट्रेट दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. ही फळे लहान लिंबू एवढ्या आकाराची असताना उपाययोजना केल्यास निश्चित त्याचा फायदा होईल.

सध्याच्या स्थितीत, फळ गळती झालेल्या कैऱ्या बाजारामध्ये विक्रीला नेणे केव्हाही फायद्याचे ठरेल. सध्या कैऱ्याच्या बाजारामध्ये वाढ झालेली दिसून येते. सध्याचा, कैऱ्यांचा बाजारभाव पाच हजार ते नऊ हजार प्रति क्विंटल आहे. त्यामुळे आपल्याला योग्य फायदा मिळेल.

आंब्याची फळे दोन-तीन आठवड्याचे असताना, त्यामध्ये गळती होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून, दर पंधरा दिवसाला पाण्याचे योग्य प्रमाणात पाळी द्यावी. आंबा लहान असताना, त्यामध्ये इथेनॉलचे प्रमाण खूप अधिक असते. यामुळे फळे गळती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत राहते. जसे हे प्रमाण कमी होईल. तसे आंबा गळती अधिक होणार नाही.

अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी, फळबागांची माहिती पाहण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान पाहण्यासाठी. शेतीविषयक संशोधन, यशोगाथा, वाचण्यासाठी मी E शेतकरी चॅनेल फॉलो करा:
https://t.me/farmersdigitalmagazine

हेही वाचा:
एका ध्येयवेड्याची यशोगाथा वाचा: कसा उपयोग केला ऊसाच्या शेतीचा.

अरे वा सरकार देते तीन हजार रुपये प्रति महिना; काय आहे सविस्तर बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button