ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

‘या’ सरकारी योजनेतून महिलांना मिळणार दरमहा चार हजार रुपये कमवायची संधी वाचा काय आहे ही योजना…

What is the opportunity for women to earn Rs 4,000 per month from this government scheme?

केंद्र सरकार व राज्य सरकार (Central Government and State Government) महिलांना उद्योग, व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत आहे व त्याकरता विविध योजना देखील राबवत आहे. जेणेकरून महिला स्वयंरोजगारासाठी (For women self-employment) प्रेरित होऊन स्वावलंबनाचा दिशेने वाटचाल करता यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

उत्तर प्रदेश राज्य सरकारने (Uttar Pradesh State Government) महिलांना स्वयंरोजगाराला प्रेरित करण्यासाठी एक योजना राबवली आहे, योजनेद्वारे महिला बँक एजंट (Women Bank Agent) बनून पैसे कमावू शकतात. यासाठी त्यांना बँकेकडून अतिरिक्त कमिशनही मिळणार आहे. या योजनेचे नाव बीसी (बँकिंग करेस्‍पॉन्‍डंट) सखी योजना (BC (Banking Correspondent) Sakhi Yojana) असे आहे.

हे ही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…

काय आहे बीसी (बँकिंग करेस्‍पॉन्‍डंट) सखी योजना? (What is BC (Banking Correspondent) Sakhi Scheme?)

बँक सखी महिलांना घरोघरी जाऊन, बँकिंग सुविधा विषयी माहिती द्यावी लागणार आहे, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी बँकेशी संलग्न व्हावे हा त्यामागील हेतू आहे, बँकेच्या विविध योजनांची माहिती सांगणे, बॅंकेमधील नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारची कामे बँक सखींना करावी लागणार आहेत.

हे ही वाचा : Goverment Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ‘पीक विम्याचा’ अधिक फायदा मिळण्यासाठी उचलणार महत्त्वाचे पाऊल…

बँक सखी झाल्यास काय फायदा होईल?

या योजनेची सुरुवात 22 मे 2020 मध्ये झाली असून मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही योजना राबविली असून महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्य ध्येय होते.

सुरुवातीच्या शासनाकडून दरमहा 4 हजार रुपये प्राप्त होतील. नंतर त्यांना स्वतंत्र कमिशनही मिळेल. ज्याद्वारे ती अधिक पैसे कमवू शकते.

डिजिटल माध्यमांद्वारे राज्यातील नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे, तसेच नागरिकांना बँकाशी व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे अश्या कामाच्या माध्यमातून बँकिंग सखीला त्यांना 6 महिन्यांसाठी दरमहा 4,000 रुपये दिले जातील. बँकेच्या वतीने त्यांना ग्रुप फ्रेंड म्हणून काम करण्याच्या स्टायपेंड म्हणून कमिशन आणि दरमहा 1200 रुपये दिले जातील. बँकिंग सखीलाही याव्यतिरिक्त व्याजाशिवाय कर्ज दिले जाईल. याशिवाय त्यांना बँकिंग विभागाकडून विशिष्ट ड्रेस देखील देण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

सोयाबीनचे पिकाबरोबर घ्या, ‘हे’ आंतरपीक आणि मिळवा लाखो रुपयांचा फायदा!

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी होते पुरस्कारांची बरसात! तुम्हीही होऊ शकता लाभार्थी!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button