ताज्या बातम्या

आकाशातून पडणाऱ्या विजेचा होल्ट आणि करंट किती असतो? जाणून घ्या सविस्तर..

आकाशातून पडणार्या विजेचा होल्ट आणि करंट (Holt and current) माहिती असणे गरजेचे आहे. पडणाऱ्या विजेमुळे होणारी जीवित हानी (Loss of life) झालेली आपण नेहमी ऐकत पाहत आलेलो आहे. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेला कैद करण्याची कल्पनाही आपल्या मनात डोकावून जात असेल. पण, हे शक्य नाही.

आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या विजेला बंदिस्त करून तिचा वापर करता येऊ शकत नाही. कारण, तिच्यात प्रचंड प्रमाणात प्रवाह (Flow) असतो. या विषयी विचारलेल्या प्रश्नाला कोरा या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

एका विजेच्या लोळामध्ये –

300 मिलियन म्हणजेच 300 दशलक्ष वोल्ट आणि 30000 अँप्स् ऊर्जा असते. तुलनेने घरगुती वीजप्रवाह 120 वोल्ट आणि 15 अँप इतका असतो. नेहमीच्या 100 वॅट (Watt) क्षमतेचा एक फ्लूरोसेंट बल्ब 3 महीने व तसाच छोटा फ्लूरोसेंट बल्ब (Fluorescent bulbs) जवळपास वर्ष भर चालेल इतकी ऊर्जा एका विजेच्या लोळात असते.

ऐका विजेमध्ये एक अब्ज वोल्ट विद्युत ऊर्जा असते-

ढगातून जमिनीवर कोसळणार्‍या विजांचे लोळ (Lightning rod) ही फार सामान्य घटना आहे. तसेच सर्व ठिकाणी आणि सतत होणारी प्रक्रिया देखील. प्रत्येक सेकंदास सुमारे 100 अशा विजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळत असतात. पण त्यांची शक्ती मात्र अफाट असते. प्रत्येक विजेच्या लोळात एक अब्ज वोल्ट (One billion volts) इतकी विद्युत उर्जा (Electrical energy) असते. पडणाऱ्या विजेचा प्रचंड वेग आणि तडाखा तसेच त्यात वहन होत असलेली उर्जा (Energy) एवढी शक्तीशाली असते की तिला उपयोगासाठी साठवणे अजून शक्य झाले नसल्याचेही सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button