योजना

Majhi Ladki Bahin Yojana| : महाराष्ट्रात चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची|

Majhi Ladki Bahin Yojana| : या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात महिला उत्सुक दिसत आहेत. या योजनेवरुन विरोधकांनी सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.लाडकी बहिण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना सुरु करावी असा टोला विरोधकांनी लगावला होता. विरोधकांच्या टीकाले उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ यांनी लाडका भाऊ योजना असे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारी केली होती. याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन (statement) दिले होते. सभागृहाच्या पटलावर चर्चा होऊन त्याचा जीआर काढण्यात येतो. मात्र, तसं न करता थेट जीआर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. फक्त होर्डिंगसाठी ही योजना जाहीर केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.

वाचा:Skin Color| लिंबाच्या सालीचे अद्भुत उपयोग|

काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना?

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याचं, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध (Available) केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.

तरुणांसाठी खास योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन टीका झाल्यानतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास यजना जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांमध्ये याजनेचा समावेश आहे. युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10 हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड दिला जाणार आहे. ही तरुणांसाठी असलेली लाकडा भाऊ योजना असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर (reply) दिले.

मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस

राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामडळ, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार
चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी 250 कोटी देणार
मुंबई महापालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ
15 वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय (decision)
पालघरला विमानतळ करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button