योजना

काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ? जाणून घ्या सविस्तर…

What is Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme? Learn more ...

शेतकरी हा आपला जीवनदाता आहे तो देशाचा कणा आहे आज तो आहे म्हणून आपण आहोत मग त्याच्या जीवनात काय समस्या आहेत तो बळीराजा कसा घर संसार चालवतो,त्याच्या समोर येणारे संकट याकडे आपण पाहतो का ?

हाच विचार करून सरकारच्या वतीने बळीराजासाठी एक महत्वाची विमा योजना काढली गेली ज्याचे नाव ठेवले गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना.

काय आहे ही गोपीनाथ मुंडे विमा योजना

मुंडे यांनी आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर, ऊसतोडणी मजूर, उपेक्षितांसाठी संघर्ष केला. या पाश्र्वभूमीवर

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यात सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मुंडे यांच्या नावाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या. राज्य सरकारमार्फत २००6 पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा या सुरू असलेल्या योजनेचे 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा असे नाव देण्यात आले.

शेतात काम करताना वेगवेगळय़ा कारणांनी अपघातात मृत्यू आणि अपंगत्व आल्यानंतर आíथक साहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली ज्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा मिळतो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची पात्रता:

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील वारसदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.

या योजने अंतर्गत कोणते किंवा कशासाठी विमा संरक्षण मिळते ?

1- अपघाती मृत्यू : २ लाखाचे संरक्षण

२- अपघातात एक हात किंवा पाय आणि दोन डोळे निकामी होणे : २ लाखांचे विमा संरक्षण

३- अपघातात एक डोळा किंवा एक हात अथवा पाय निकामी होणे : १ लाखाचे विमा संरक्षण

विमा संरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • 1- मृत्यू दाखला
  • 2 – प्रथम माहिती अहवाल.
  • 3 – विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल.
  • 4 – घटनास्थळ पंचनामा
  • 5 – वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)

सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

अर्ज करण्याचे ठिकाण :

तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

काही ठळक गोष्टी:

शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्याच्यावतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विमा कंपनी कडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. ही संपूर्ण रक्कम शासनाकडून विमा कंपनी कडे भरली जाते

शेतकऱ्याने अन्य कोणत्याही विमा योजना घेतली असेल तरी त्याचा या योजनेशी काही संबंध नसेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button