कृषी सल्ला

काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…

What do you say! Get all the information of Vaccination Center on your WhatsApp just follow these steps

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात करूनच प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे बरेच ठिकाणी कडकडीत लॉकडाउन ची अंमलबजावणी होत असताना दिसत आहे. तरीदेखील म्हणावा इतका परिणाम होताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोणाचा विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,गेल्या चोवीस तासात 3689 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्या 33,49,644 च्या वर गेलेली आहे. नुकतेच केंद्र सरकारने अठरा वर्ष वरील लोकांना लसीकरण देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. लसीकरणासाठी कोरोना लसीकरण केंद्राचा शोध घेत असेल तर घराबाहेर पडण्याची काहीही गरज नाही, तुम्ही फक्त या स्टेप फॉलो करा.

हेही वाचा ऑक्सीजन तुटवडा कमी सरकारने घेतला हा सर्वात मोठा निर्णय

1) तुमच्या जवळपास असणारे लसीकरण केंद्र चालू असल्याची माहिती MY GoV कोरोना हेल्पडेस्क व्हाट्सअप सर्व माहिती प्रोव्हाइड करेल.

2) MyGovIndia ने आपले ट्विटर हॅण्डल वर केलेल्या पोस्ट नुसार 9013151515 वर (नमस्ते) असे पाठवावे लागेल.

3) यानंतर आपल्याला त्वरित प्रतिसाद येईल, त्यानुसार तुम्हाला सहा अंकी पिनकोड टाकावा लागेल.

 हेही वाचा केळी उत्पादकांच्या नवीन एप्लीकेशन काय आहेत याची वैशिष्ट्य आहे ते पहा

4) लसीकरण केंद्राची यादी सोबत covid-19 लस नोंदणीची लिंक मिळेल जे आपल्याला थेट कोविनच्या वेबसाईटवर घेऊन जाईल.

5) या वेबसाईटला भेट देऊन आपण आपला फोन नंबर नोंदणी केल्यानंतर ओटीपी आणि आयडी प्रूफ नंबर प्रविष्ट करून नोंदणी करू शकतो. तसेच आरोग्य सेतू ॲप किंवा कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग एप्लीकेशन द्वारा देखील आपण नोंदणी करू शकतो.

6) कोवीड हेल्पडेस्क इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आहे त्याकरता व्यक्तीने हिंदीमध्ये संदेश पाठवून भाषा सेट करू शकता.

हीच सर्व माहिती MYGovIndia ने आपले ट्विटर ची माहिती तसेच संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:
1) बाजारात आले आहे बनावट रेमडीसवार खरे इंजेक्शन कसे ओळखाल?
2)“लिकिंग” करून खते विकल्यास होणार यांच्याकडून कारवाई…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button