योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, अनुदान किती मिळेल…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, अनुदान किती मिळेल या सर्वांची माहिती; पहा एका क्लीक वर…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा ) अंतर्गत महाराष्ट्रात एकूण १५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अकोला, वाशीम, अमरावती,वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड,लातूर आणि उस्मानाबाद या १५ जिल्ह्यातील एकूण ५१४२ गावांची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये प्रकल्प जिल्हे – १५ , प्रकल्प तालुके १५५, ग्रामपंचायती- ३७५५, गाव समूह -६७० , प्रकल्पातील गवे- ५१४२, त्यापैकी खारपान गवे- ९३२, शेतकरी -१७ लाख , शेतजमीन -२६ लाख हे. समावेश करण्यात आला आहे.

या योजनेमध्ये एक समिती नेमण्यात आली आहे त्याचे नाव आहे ग्राम कृषी संजीवनी समिती या समितीमध्ये सरपंच अध्यक्ष असतो तर उपसरपंच सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य , प्रगतीशील शेतकरी, अनुसूचित जाती , जमातीतील १ सदस्य असतील. महिला शेतकरी एक सर्वसाधारण गटातील तर एक अनुसूचित जाती , जमातीमधील आणि विमुक्त जाती मधील एक अस्या एकूण तीन असतील .

या योजनेचा लाभ घेण्याकरिया शेतकरी अर्जदारांनी प्रकल्पाच्या www.mahapokra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत.

अर्ज सादर करण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करावीत…

1. अर्जदाराचा ७/१२ व ८ अ चा उतारा.

2. अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असल्यास त्याबाबत पुरावा

3. अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

1. पोखरा अंतर्गत असलेल्या योजना…

हवामान अनुकूल कृषी पद्धतीस प्रोत्साहन देणे

सहभागीय पद्धतीने गाव समूहाचे नियोजन

सहभागीय पद्धतीने गाव समूहाचा आराखडा तयार करणे यास १००% अनुदान

कृषी मित्र कृषी ताई यांच्या सहकार्याने जागृती यास १००% अनुदान

2. हवामान अनुकूल कृषी पद्धती

हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा १०० % अनुदान

3. जमिनीमध्ये कर्रब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यामध्ये

वृक्षलागवड ( बांधावर / गटांमध्ये लागवड) यासाठी १०० % अनुदान

फळबाग लागवड लागवड- आंबा/ लिंबू वर्गीय फळे / आवळा/ सीताफळ /पेरू/ डाळिंब यासाठी १०० % अनुदान

4. क्षरपद आणि चोपण जमिनीचे व्यवस्थापन यामध्ये ( खारपाणग्रस्त गावे ) –

सबसरफेस ड्रीनेज ५० % अनुदान

हवामान अनुकूल शेती शाळा १०० % अनुदान

शेततळे (जैविक बंधासह इनलेट व आउटलेट असलेली ) यासाठी ५० % अनुदान

पाणी उपसा साधने ( पंपसंच ) ५० % अनुदान

तुषार सिंचन ५० % अनुदान

संरक्षित शेती

शेडनेट हाऊस (GI पाईप ) १०००चौ. मी – ५०% अनुदान

शेडनेट हाऊस (बांबू )१००० चौ. मी ५० % अनुदान

पॉलीहाऊस (५००) चौ मी ५० % अनुदान

पॉलीटनेल ( १००० चौ. मी ) ५० % अनुदान

पॉलीहाऊस, शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला/ फुलपिकांचे उछमूल्यांकन लागवड साहित्य – ५० % अनुदान

5. एकात्मिक शेती पद्धती

बंदिस्त शेळीपालन – ५० % अनुदान

कुक्कुट पालन – ५० % अनुदान

रेशिम उद्योग – ५० % अनुदान

मधुमक्षिका पालन – ५० % अनुदान

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन – ५० % अनुदान इतर कृषी आधारित उद्योग – ५० % अनुदान

6. जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये गांडूळखत आणि नाडेप पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन – ५० % अनुदान सेंद्रिय खात निर्मिती युनिट – ५० % अनुदान

7. पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर यामध्ये सलग समतल चर मॉडेल ५ ते ८ (०. मीटर) १००% अनुदान सलग समतल चर मॉडेल ५ ते ८ (०.४५ मीटर) १००% अनुदान यानंतर दगडाचे बांध, माती नाला बांध सिमेंट नाला बांध यासाठी १०० % अनुदान आहे

8. पाणी साठवण सरचनांची निर्मिती यामध्ये, सामुदायिक शेततळे इनलेट व आउटलेट असलेली व नसलेली या दोन्ही साठी १०० % अनुदान आहे. शेततळे इनलेट व आउटलेट असलेली ५० % अनुदान शेततळे इनलेट व आउटलेट शिवाय व अस्तरीकरणासह ५० % अनुदान

शेततळे अस्तरीकरण – ५० % अनुदान

विहीर- १०० % अनुदान आहे

जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन ( गाळ काढणे/ खोलीकरण/ दुरुस्ती – १०० % अनुदान आहे भूजल पुनर्भरण – १०० % अनुदान आहे मूलस्थानी जलसंधारण ( शेत बांध / बंदिस्त / ढाळीचे बांधबंदिस्ती – १०० % अनुदान आहे.

9. सूक्ष्म सिंचन मध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन , संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता पाणी उपसा यासाठी ५० % अनुदान आहे.

पाइप लाईन साठी ५० % अनुदान आहे

10. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक संघ/ शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सशक्तीकरण करणे यासाठी १०० % अनुदान भाडे तत्वावर कृषी अवजारेकेंद्र – सुविधा निर्मिती ५० % अनुदान

11. शेतमाल वृद्धीसाठी हवामान अनुकूल उदयोन्मुख मूल्यसाखळ्यांचे बळकटीकरण यात शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक संघ/ शेतकरी उत्पादक कंपनी याना कृषी उत्पादनांचे संकलन, पाथमिक प्रक्रिया, दर्जानुसार वर्गीकरण , स्वच्छता व साठवणुक ईत्यादी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण साठी साहाय्य – ५० % अनुदान

12. हवामान अनुकूल वाणाचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे -५० % अनुदान बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणांचे साठवण गोदाम , बियाणे सुकवणी यार्ड – ५०% अनुदान.

WEB TITLE: What are the schemes for farmers under Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani project, how much grant will be given …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button