Weather updates आनंदाची बातमी: यावर्षी ‘इतके’ टक्के पडणार पाऊस! भारतीय हवामान विभागाकडून दुसरा सुधारित अंदाज जाहीर…
Weather updates Good news: Rain will fall 'so much' this year! Indian Meteorological Department releases second revised forecast
भारतीय हवामान विभागाकडून (From the Indian Meteorological Department) दुसऱ्या सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला, या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये 101% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, या अंदाजानुसार कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
त्याचवेळी मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात In Marathwada and South Central Maharashtra) सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी प्रथमच 36 हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण व पूर्व विदर्भ (Konkan and East Vidarbha) विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या तुलनेमध्ये मराठवाडा विभागामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता ही सांगण्यात आले आहे,
शेतीच्या दृष्टीने मान्सूनच्या पावसाचे विशेष महत्त्व आहे त्याकरता भारतीय हवामान विभागाने शेती क्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन (Core zone) निश्चित केला आहे. अशा ठिकाणी 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
यंदा मान्सून उशीरा येण्याची शक्यता
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा येणार असून केरळमध्ये 3 जूनपर्यंत केरळमध्ये ( Kerala) दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, केरळमध्ये पाऊस पडत असला तरी मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले हे जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेले पाऊसमान, वार्यांची दिशा हे निकष पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कदाचित महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये देखील मान्सूनचे उशिरा आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.
हेही वाचा :
1)स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…
2)टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…