हवामान

Weather Update : आठवड्यातील हवामान अंदाज, कुठे बरसणार्‍या पावसाच्या सरी! पाऊस करेल का पुन्हा कमबॅक?

Weather Update: Weekly weather forecast, where the rain showers! Will it rain again?

या वर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधी हजेरी लावली असली तरीही, काही दिवसातच पावसाने दडी मारली, मध्यंतरी झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी (Sowing) देखील आटपून घेतल्या परंतु राज्यातील काही भागात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ शकतो, असं देखील सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या आठवड्यातील हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा: दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण…

या आठवड्यात कुठे पडणार पावसाच्या सरी?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

हे ही वाचा: खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा:


1. अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…

2. ‘पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

3. मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button