Weather Update | अर्रर्र..! ऐन थंडीत शेतकऱ्यांची पिके झोडपणार; पुढच्या २४ तासांत ‘या’ भागांत मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
Arrrr..! Farmers' crops will fail in winter; Warning of heavy rain and hail in 'these' areas in the next 24 hours
Weather Update | राज्यात आज (ता.२६) अंशतः ढगाळ हवामान होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीट (Weather Update) होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वरील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा इशारा
राज्यात आज (ता.२६) पावसाची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वाचा : Onion Rate | अर्रर्र..! कांदा उत्पादकांवर मोठं संकट; बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात पुन्हा ‘इतकी’ घसरण
शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान
अंशतः ढगाळ हवामान आणि उन्हाचा वाढलेला चटका यामुळे कमाल तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. गारठा काहीसा कमी झाला आहे. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान होते. बहुतांश ठिकाणी तापमान १५ ते २४ अंशांदरम्यान आहे. शनिवारी (ता. २५) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस तापमान राहिले. गारपीटमुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच, घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Web Title: Arrrr..! Farmers’ crops will fail in winter; Warning of heavy rain and hail in ‘these’ areas in the next 24 hours
हेही वाचा :