हवामान

Weather Update | अरबी समुद्रात हालचाली सुरू! कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात हलका पाऊस पडणार?

Weather Update | Movement in the Arabian Sea! Light rain in Konkan and Madhya Maharashtra next week?

Weather Update | अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात (Weather Update ) पावसाची सुरुवात होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात 11 ते 13 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

वाचा : Birth and Death Registration | एक वर्षानंतरच्या जन्म-मृत्यू नोंदणीसाठी न्यायालयात जाण्याची गरज नाही, तहसीलदारांकडे अधिकार!

पावसामुळे उर्वरित राज्यातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे आवाहन

हवामान विभागाने नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे, नदी नाल्यांमध्ये जाणे टाळावे. तसेच, वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.

हेही वाचा :

Web Title : Weather Update | Movement in the Arabian Sea! Light rain in Konkan and Madhya Maharashtra next week?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button