हवामान

Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता; जाणून घ्या कुठे आणि किती प्रमाणात पडेल पाऊस?

Weather Update | Farmers, chances of rain with lightning in 'these' districts of the state; Know where and how much rain will fall?

Weather Update | कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी (ता. ११) पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असले तरी, या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे, महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात कमाल तापमान ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान होते. किमान तापमानात वाढ झाली असून, पारा पुन्हा १७ अंशांच्या पुढे गेला आहे.

वाचा :

शुक्रवारी (ता. १०) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सिंधुदुर्गात विजांसह पावसाची शक्यता

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज (ता. ११) सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे.

हेही वाचा

Web Title : Weather Update | Farmers, chances of rain with lightning in ‘these’ districts of the state; Know where and how much rain will fall?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button