ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | ब्रेकिंग ! अरबी समुद्रात ‘तेज’ चक्रीवादळाची शक्यता, हवामान बदलाची शक्यता..

Weather Update | Breaking! Possibility of 'strong' cyclone in Arabian sea, possibility of climate change..

Weather Update | अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत देखील जाणवण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान {Weather Update} विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या शेजारच्या लक्षद्वीप परिसरात चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. या चक्रीवादळाच्या सर्कुलेशनच्या प्रभावामुळे येत्या ३६ तासांमध्ये पूर्व-मध्य तसेच लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत.

मुंबईत हवामान बदलाची शक्यता

या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत देखील जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे..

वाचा : Weather News | महाराष्ट्रातून मान्सूनाचा परतीचा प्रवास सुरू! शेतकऱ्यांनो जाणून घ्या पुढच्या चार दिवसांत कुठे पडेल पाऊस?

चक्रीवादळ तेज

पाण्याचे वाढलेले तापमान यामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ विकसीत होण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम काळ असतो. तसेच २०२२ नंतरच्या मॉन्सून हंगामात अरबी समुद्रावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण झाले नाहीत, याउलट सित्रांग आणि मंडौस या दोन उष्णकटिबंधीय वादळांनी बंगालच्या उपसागरात धडक दिली होता. त्यामुळेच अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वाढते असा दावा करण्यात आला आहे.

चक्रीवादळापासून बचाव

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात:

  • चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गावर असलेल्या भागातील नागरिकांनी निवारा शोधून घ्यावा.
  • घरातून बाहेर पडताना आवश्यक ती कागदपत्रे आणि सामान सोबत ठेवावे.
  • झाडाखाली किंवा उंच इमारतींच्या जवळ थांबू नये.
  • विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
  • वाहतुकीचा अडथळा होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.

चक्रीवादळाचा मार्ग आणि वेळ अनिश्चित

स्कायमेट वेदरनुसार अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मार्ग आणि वेळ ही अनिश्चित असू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

हेही वाचा :

Web Title : Weather Update | Breaking! Possibility of ‘strong’ cyclone in Arabian sea, possibility of climate change..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button