हवामान

Weather News | महाराष्ट्रातून मान्सूनाचा परतीचा प्रवास सुरू! शेतकऱ्यांनो जाणून घ्या पुढच्या चार दिवसांत कुठे पडेल पाऊस?

Monsoon's return journey from Maharashtra begins! Farmers, know where the rain will fall in the next four days?

Weather News | भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून मान्सूनाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, राज्यातील 45 टक्के भागातून मान्सून परतला आहे.

मान्सून परतला
पुणे शहरातून मान्सून परतला असून, पुणेकरांना आता ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील चार दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाचं प्रमाण देखील असमान राहिलं आहे.

वाचा : Weather | पुढचे तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांसह बरसणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान
काही भागांमध्ये मुसळधार कोसळला तर काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पावसाच्या असमानतेचा पिकांना देखील मोठा फटका बसला. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं तर काही ठिकाणी पाऊस वेळेत न पडल्याचा फटका पिकांना बसला.

हेही वाचा :

Web Title: Monsoon’s return journey from Maharashtra begins! Farmers, know where the rain will fall in the next four days?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button