ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Weather News | थंडीच्या झळांबरोबरच अवकाळी पावसाचा हल्ला! शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकांवर कसा होणार परिणाम?

Weather News | Attack of unseasonal rain along with cold spells! The concern of farmers increased, how will the crops be affected?

Weather News | देशासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather News)यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली आहे. (Cold wave in Maharashtra) सकाळी हाडं गोठवणारी थंडी तर दुपारी कडक उन्हाचा चटका नाशिककरांना बसत आहे. लासलगावसह निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

गेल्या 15 दिवसात राज्यासह नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. मधील काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. (Maharashtra weather alert) पण आता पुन्हा थंडी पुन्हा वाढली आहे. हरभरा, गहू या पिकांना जरी या थंडीचा फायदा होत असला तरी मात्र या थंडीने फळबगांसह द्राक्षपिकांच्या वाढीवर याचा परिणाम होत आहे. यामुळे द्राक्षांची वाढ मंदावण्याची शक्यता असल्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.

वाचा : One Nation One Ration | वन नेशन, वन रेशन कार्ड योजना संपूर्ण देशात लागू; आता संपूर्ण भारतात कोठूनही घ्या धान्य,

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्याच्या तयारीत राहण्याचे आवाहन केले जात आहे.

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा पावसामुळे पिके उद्ध्वस्त होतात, शेतातील अवजारे खराब होतात, तसेच शेतात पाणी साचल्याने रोगराईचा प्रादुर्भाव होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

अवकाळी पावसापासून बचाव कसा करावा

अवकाळी पावसापासून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना कराव्यात.

  • शेतातील पाणी निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.
  • शेतातील पिकांना पावसापासून संरक्षण देण्यासाठी शेतीत पडदे लावावेत.
  • शेतात पाणी साचू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
  • अवकाळी पावसाची माहिती मिळाल्यास तातडीने शेतात जाऊन पिकाचे निरीक्षण करावे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

Web Title | Weather News | Attack of unseasonal rain along with cold spells! The concern of farmers increased, how will the crops be affected?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button