हवामान अंदाज: येत्या तीन दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
Weather Forecast: Rain likely in these districts in next three days
गेल्या दोन-तीन दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला होता ,त्यामध्ये सोलापूर मधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. उद्या (गुरुवार) पासून पूर्व मोसमी पावसाचा वेग काहीसा मंदावेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच राज्यामध्ये आज ढगाळ हवामान असण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे,ओडिसा तमिळनाडूमध्ये चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम राज्यांमध्ये होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे.
राज्यामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून सकाळी ऊन दुपारी पावसाच्या धारा त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे .याचा परिणाम म्हणून किमान व कमाल तापमान वर परिणाम झालेला दिसतो.
बुधवार ,गुरुवार ,शुक्रवार येथे पाऊस पडण्याची शक्यता:
रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा, विदर्भ परभणी, हिंगोली ,लातूर ,अकोला अमरावती, भंडारा , वाशिम.