ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

हवामान अंदाज: मराठवाड्यातील बळीराजाची चिंता मिटली, शेत-शिवार पुन्हा बहरणार…

Weather Forecast: Baliraja's worries in Marathwada are over, farms will flourish again

गेल्या काही दिवसांपासून अनुकूल हवामान नसल्याने पावसाने दडी मारली होती. मात्र आता बिहार आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत त्यापासून आंध्र प्रदेशातील हवेचा कमी दाबाचा दक्षिणोत्तर पट्टा तयार झाला असून दक्षिण मराठवाड्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

कुठे बरसणार पाऊस…
दिनांक 15 ऑगस्ट पासून परभणी, हिंगोली, नांदेड, आणि लातूर या जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात दि. 15 ते 17 ऑगस्ट 2021 दरम्यान कोकण गोवा परिसरात देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार…
15, 16 आणि 17 ऑगस्ट 2019 रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत कायम आहे, मान्सून च्या आसा चे पश्चिम टोक सर्वसाधारण स्थितीत आहे तर पूर्व टोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे. या स्थितीमुळे विशेष करून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button