हवामान

हवामान अलर्ट: “या” जिल्ह्यात 5-6 दिवसापासून सतत पावसाचा अंदाज; काही पिकांना फायदा तर काही पिकांचे नुकसान..

Weather Alert: Continuous rain forecast for 5-6 days in "this" district; Some crops benefit and some crops lose.

नांदेड जिल्ह्यामध्ये मागली पाच-सहा दिवसापासून पावसाची सुरुवात झाली आहे. यासह पाऊस नायगाव, हदगाव या तालुक्यात पाऊस चांगला पडला. आज सकाळी सोमवारी सकाळी साडेदहा पर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.६० मिलीमीटर पावसाची नोंद (Rainfall record) झाली आहे. सतत पाऊस सुरू असल्याने व मागील काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे काही पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत असल्याचे दिसत आहे. त्या बरोबर काही पिकांसाठी देखील पाऊस दिलासादायक ठरत आहे. पाहूया सविस्तरपणे..

वाचा: फक्त 7 रुपयामध्ये माती परीक्षण: आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? सांगणार “हे” नवीन तंत्रज्ञान..

या ठिकाणी पाऊस..

पुढील 3-4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्यामुळे IMD ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड ह्या चौदा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे वेगवान वारे देखील वाहतील.

येत्या 3-4 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक प्रभाव राहणार असून कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा: पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

तालुकामधील पाऊस –

नांदेड २.४०, बिलोली ३.२०,मुदखेड १.९०, मुखेड ७.३०, कंधार ३.२०, लोहा ८.६०, हदगाव १६.८०, भोकर ०.८०, देगलूर २.१०, किनवट ०.८०, हिमायतनगर १.६० तसेच माहूर ०.६०, धर्माबाद ५.४१, उमरी ०.५०, नायगाव १८.८०, अर्धापूर ९.५० या ठिकाणी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वाचा: २०२१ चा खरीप पीक “हमीभाव” जाहीर! सर्वांत अधिक कोणत्या पिकाला मिळाला भाव? पहा सर्व पिकांचे हमीभाव…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button