मॉन्सूनचे आगमन पहा अहमदनगर जिल्हा मध्ये यावर्षी किती टक्के पाऊस पडणार…
Watch the arrival of the monsoon; What percentage of rain will fall in Ahmednagar district this year ...
खरीप हंगाम (Kharif season) हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे साहजिकच सर्व शेतकरी (Farmers) बांधवांचे नजरा शेतातील कामे झाल्यानंतर मान्सूनवर टिकून असतात. काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी गरजेपेक्षा अधिक पाऊस पडतो.
कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे (The founder of Krishi Meteorological Forum South Asia, senior agro-meteorologist Dr. Ramchandra Sable) यांनी नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. सुधारित भारतीय हवामान अंदाजनुसार अहमदनगर, नाशिक, खानदेश आणि मराठवाडा या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
सावधान! शेतकऱ्यांच्या नावाने खत अनुदान व्यापारीच लुटतायत का? वाचा सविस्तर बातमी…
डॉ. साबळे यांच्यामते, पाऊस गुजरातच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये पावसात मोठे खंड जुलै सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे, पेरणी करताना त्या भागात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पुरेसा ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी. तसेच शेतामध्ये आंतर पीक घेण्याकडे लक्ष द्यावे असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
1)मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?
2)किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!