Weather | बंगालच्या उपसागरातील ‘मंडोस’ (Cyclone Mandos) चक्रीवादळाचा परिणाम प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांवर (Maharashtra Weather) होण्याची शक्यता आहे. याच चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) देखील दिसून येईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.
राज्यात आज पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या (Cyclone) प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर कला किमान तापमानात अचानक मोठी घट झालीय. यामुळे आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण (Atmosphere) होण्याची शकता आहे. त्याचमुळे पावसासाठी पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने(Meteorological Department) वर्तवली आहे.
कुठे होईल पाऊस
तर आज शनिवारी दिनांक 10 डिसेंबरपासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
‘या’ जिल्ह्यांत होणार पाऊस
या मंडोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातारणामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर आता नाशिक, नगर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागणी आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक
- ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Web Title: Warning of unseasonal rain in the state! Rain with lightning will occur in these districts, know in detail..