दुग्धव्यवसाय करायचा आहे? तर अधिक दुग्धोत्पादन देणाऱ्या म्हशींच्या जातींविषयी जाणून घ्या..
आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा 55% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रक्रिया दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे फायदेशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रीतीने करण्याची गरज आहे. यासाठी दुधाच्या म्हशींच्या जातीविषयी माहीत असणे गरजेचे आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
उत्तम दूध देणाऱ्या म्हशींच्या जाती –
1) मुऱ्हा – उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रातही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. ऐका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांचे प्रमाण जास्त असते.
2) मेहसाना – ही जात सुरती व मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळती जुळती आहेत. व म्हशी ऐका वेतात सरासरी 2000 लिटरपर्यंत दूध देतात.
वाचा –
3) पंढरपुरी – सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरात या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. या म्हशी ऐका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.
4) सुरती – शरीर बांधा मध्यम, डोळे मोठे लांबट, रुंद असतात. भुवयांचे केस पांढरे व शिंडे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा काळपट असतो. ऐका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा