कांदा पिकाचे उत्पादन (Onion crop production) चांगले होते. तसेच या पिकाची काळजीही व्यवस्थित घ्यावी लागते. कांदा पिकाच्या किडीमुळे होणाऱ्या नुकसानास शेतकरी अक्षरशा वैतागून गेलेला आहे. आता या किडीचे नियंत्रण कसे करायचे यासाठी शेतकरी नवनवीन उपाययोजना करत असतो. चांगले उत्पादनासाठी कांदा पिकाची काळजीही तशीच घ्यावी लागते. कीड व कांदा नियोजन करून अधिक उत्पादन कसे घेता येईल? याविषयी आपण सविस्तर माहिती घेवूया…
वाचा –
कांद्यावरील काळ्या डागाचे नियंत्रण असे करा –
खरीपात कांद्यावर किडीचे प्रमाण अधिक दिसून येते. कांद्याच्या पातेवर काळ्या रंगाचे डाग तयार होतात हे नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना आहेत. याचे नियंत्रण करण्यासाठी कांदा पिकाची लागवड करण्याआधी रोपांची मुळे मध्ये बुडवून घ्या. तसेच रोपांची लागवड जमीनिपासून उंचीवर करा. नर्सरीतील बीज लावत असाल तर ठराविक अंतरावर लावा.
जांभळा डाग देखील असतो –
कांद्याच्या सर्व भागावर या किडीचा प्रादुर्भाव असतो. पांढरे व तपकिरी डाग असतात. या रोगामुळे आपण जो कांदा साठवून ठेवाल तेव्हा तो सडतो. यामुळे शेतकरींना मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी कांदा बियाण्यांवर 2.5 ग्रॅम प्रति किलो दराने थेअरमचे उपचार करा. जेव्हा किडीचा प्रादुर्भाव मुख्य पिकावर होतो तेव्हा 2.5 ग्रॅम क्लोरोथालोनिल 75% प्रति लिटर पाण्यामध्ये, 2.5 ग्रॅम डिथन एम-45 0.01 सॅन्डोव्हिट किंवा कोणत्याही चिकट पदार्थात मिसळणे आवश्यक आहे. 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारणी करा. अशाप्रकारे कीटकांचे नियंत्रण करून कांदा पिकामध्ये अधिक उत्पन्न काढू शकता.
वाचा –
थ्रीप्स किटकाचे नियंत्रण –
या नावाचा एक लहान कीटक असतो. जो पातेमधील रस शोषण करत असतो. यामुळे पांढरे व पिवळे डाग पातेवर पडत असतात याचा नंतर तपकिरी होतो. याचे नियंत्रण करण्यासाठी कांदा बियाण्यांवर इमिडाक्लोपीड 70 डब्ल्यूएस पावडर (2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे) ची फवारणी करुन बी पेरा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा