ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पंतप्रधान पीक विमा योजनामध्ये कोणत्या पिकास किती रुपयेचा हप्ता आहे? तसेच नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत

Want to join PM crop insurance scheme? Find out which crop is worth how much in installments ...

शेती व्यवसाय संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येतो, शेतकऱ्यांच्या शेतमालाला म्हणजेच पिकाला विमा देण्यासाठी पिक विमा योजना केंद्र सरकारने (Central Government) काढली आहे, यामुळे पिकाचे नैसर्गिक नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यास मदत मिळते. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं (Department of Agriculture, Government of Maharashtra) शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे

पंतप्रधान पीक विमा योजना वैशिष्ट्ये.. (Prime crop insurance plan features)

ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित (Insurance cover) रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे.

पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

हे वाचा : खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…

“या” कारणांमुळे नुकसानभरपाई मिळते..

खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड, रोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यानं होणारं नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते.

खरिप हंगामातील (Kharif season) हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.

हे वाचा : आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम…

  • भात (Rice) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
  • ज्वारी (Tide) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
  • भुईमुग (Groundnut) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
  • सोयाबीन (Soybeans) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
  • मुग आणि उडीद (Mug and urad) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
  • राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का?

हे वाचा : राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का?

हे वाचा : ‘वन्यप्राण्यांकडून’ शेतीचे, जनावरांचे, मनुष्याचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईसाठी ‘अश्याप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज

विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची.. (Where to pay insurance premium)

शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या (bank) शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल (Crop Insurance Portal) आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता (Crop insurance premium) भरु शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे वाचा :

1. मखाना शेती’ म्हणजे काय व शेतीतून किती उत्पन्न मिळते; जाणून घ्या सविस्तर माहिती

2. PM Shadi Shagun Yojana : मोदी सरकारचे मुलींसाठी गिफ्ट! जाणून घ्या या योजनेचा कसा फायदा घ्याल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button