शेतकरी मित्र रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये राबवत असतात, अपार कष्ट व मेहनत करून देखील शेतामध्ये मिळणारे उत्पादन काही वेळेस असमाधानकारक (Unsatisfactory) असते. त्यामुळे शेतीतील उत्पादन (Production) वाढवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब केल्यास निश्चितच फायदा होईल.
1) बीजप्रक्रिया करणे,(Seed processing)
एक उत्तम दर्जाचे पिक येण्याकरिता तसेच पिकांचे मजबुतीकरण व जमिनीतील चांगले घटक शोषून घेणे करिता बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. उत्तमरित्या अंकुर फुटण्याकरिता पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे, यामुळे बियांना बियाणांना कवच मिळेल, अंकुर फुटण्यास मदत होईल. बरेजदा, कृषी अधिकारी देखील उत्पदन घेण्यापूर्वी बीज प्रक्रिया (Seed processing) करण्याचा सल्ला देत असतात.
2) पिकांच्या पोषणासाठी आवश्यक संतुलित आहार (A balanced diet is essential for crop nutrition)
बरेचदा पिकांचे उत्तम पोषण व्हावे याकरता अनेक शेतकरी डीएपी (DAP) खताचा वापर करतात. परंतु पिकांना इतर घटक देखील आवश्यक असतात, उदाहरणार्थ झिंक, बोरॉन, हे घटक देखील पिकांसाठी उपयुक्त ठरतात. यामुळे जमिनीची पोत वाढण्यास मदत सहाजिकच पिकांच्या पोषणासाठी हे सहकार्य करते.
3) माती परीक्षण
अशावेळी माती परीक्षण करून तसेच तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी. रोपांमध्ये कमतरता असल्यास, पाने पिवळे पडणे, वेळेपूर्वीच पाने गळणे, व इतर समस्या उद्भवू शकतात.
माती परीक्षण केलेस, तुम्हाला जमिनीमधील कमतरता तसेच आवश्यक घटक समजतील.
4) दमदार मूळांची यंत्रणा (Strong root system)
कोणतेही पीक येण्यासाठी त्याचे मूळ अधिक मजबूत व घट्ट असणे आवश्यक आहे. जेणेकरून,पोषक घटकांना अधिक कुशलतेने शोषून घेऊ शकतात आणि यातून एकूण पिकांची ताकद वाढण्यास मदत होते, तुम्ही फुलांची शेती करत असाल, हाय-ग्रेड उत्पादने शेतीच्या पद्धतींत वापरणे योग्य आहे. जेणेकरून फुलांची संख्या वाढवण्यास यामुळे मदत मिळते.
5)कीडव्यवस्थापन बाबत तज्ञांचा सल्ला :(Expert advice on pest management)
अनेकदा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे सहाजिकच उत्पादन घटते, किडींचा शोध लावण्यासाठी नेहमी कीड आढळणाऱ्या जागांचे परीक्षण केले जाते, अशा वेळेस योग्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने किडीचे व्यवस्थापन केल्यास फायदेशीर ठरेल. कृषी विषयक माहिती मिळण्याकरता महाराष्ट्र शासन देखील मदत करते, तुम्ही महाराष्ट्र शासन च्या वेबसाईटवर जाऊन देखील किड व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊ शकता.
6 ) पिकांमध्ये फेरबदल आवश्यक :(Crop rotation required)
जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांचे व्यवस्थापन होय, प्रत्येक वर्षी एकच पीक घेतल्यास जमिनीस ताण येऊ शकतो, व जमिनीची पोत बिघडू शकते, त्यामुळे पिकांमध्ये फेर-बदल आवश्यक असतो. यामुळे जमिनीची उत्तम पोषण होऊन पिके देखील जोमाने येऊ शकतात.
हे ही वाचा :
फळपीक योजनेत सहभागी व्हा! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन…
आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे कांद्याची विक्रमी आवक! वाचा सविस्तर बातमी…