अंथ्रेकनोज (Anthracnose) बुरशीजन्य रोग आहे. खरीप हंगामात कांदा (Onion) पिकावर वाढतो. हा रोग प्रामुख्याने पिकांच्या अवशेषांमधून जमिनीमध्ये आणि नंतर रोपाद्वारे किंवा कांदा (Onion) द्वारे पसरतो. हा रोग प्रामुख्याने येणारा पाऊस किती तीव्रतेचा आहे त्याचे प्रमाण आणि पावसाचे वारंवार येणे यावर प्रामुख्याने अवलंबून असते. हा रोग प्रामुख्याने कांदा पिकावर जमिनीतून अटॅक करतो. तर रोगांचे नियंत्रण कसे करायचे याविषयी सविस्तर पाहुया..
अँथ्रॅकनोज या रोगाचे नियंत्रण असे करा –
1) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीक घेताना पिकांची फेरपालट करा. पिकांचे अवशेष जमिनीत ठेवून येते, काढून टाकावीत.
2) गादीवाफ्यावर नर्सरी तयार करावी किंवा रोपांची पुनर्लागवड करावी.
3) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या रोगाला प्रतिकारक असणारे जातींची लागवडीसाठी निवड करावी. जसे की भीमा श्वेता इत्यादी.
4) बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.
5)पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांनाकार्बन्दाझीम2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपे त्या द्रावणामध्ये 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करा.
6) बियाणे टाकल्यानंतर किंवा रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर तीन किंवा चार दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर या प्रमाणात पाटपाणी द्वारे ड्रेचिंग करा.
हे ही वाचा –