योजना

घर घेयचे आहे? तर SBI ची “फेस्टिव्ह” ऑफर्स पहाच; या योजनेतून 8 लाख रुपयांची होईल बचत, ती कशी? वाचा सविस्तर..

सर्वात मोठी असलेली देशातील सरकारी बँक (Government banks in the country) स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांसाठी गृहकर्ज ऑफर्स (Home loan offers) आणलेली आहे. या ऑफर्सला सुरुवात देखील केली आहे. जाणून घेऊया ऑफर्सबद्दल सविस्तर..

होम लोन वरील व्याजदर कमी, 8 लाखांची बचत –

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांना (To customers) परवडणारे होम लोन घेता यावे या उद्दिष्टाने ही ऑफर आणलेली आहे. या बँकेने होम लोन वरील व्याजदर कमी केलेला आहे. या सोबत SBI ने 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर (Credit score) लिंक्ड होम लोन (Linked home loan) देण्याची ऑफर देखील आणली आहे. यामध्ये कर्जाची रक्कम कितीही असू शकते. याआधी 75 लाखांपेक्षा जास्त लोनवर 7.15 टक्के दराने पेमेंट करावे लागत असे. फेस्टिव्ह ऑफर्सना (Festive offers) सुरुवात झाल्यानंतर आता कमीतकमी 6.70 टक्के दराने कर्ज मिळवतील. या ऑफरमुळे 45bps ची सेव्हिंग होईल. एकूण मिळून 75 लाखाचे कर्ज 30 वर्षांसाठी घेतले असेल तर जवळपास 8 लाख रुपयांपेक्षा जास्तीची बचत होईल.

हे ही वाचा –

प्रोसेसिंग फी देखील माफ –

आतापर्यंत, वेतन नसलेल्या कर्जदारांसाठी व्याज दर पगार (Interest rate salary) वर्ग कर्जदारांपेक्षा 15bps जास्त होता. एसबीआयने (SBI) पगारदार आणि वेतन नसलेल्या गृहकर्ज (Home loan) कर्जदारांमधील फरक दूर केला आहे. सणासुदीच्या काळात बाजार सेंटिमेंटना चालना देण्यासाठी बँकेने प्रोसेसिंग फीस (processing fees) देखील पूर्णपणे माफ केली आहे.

क्रेडिट स्कोअर आधारित व्याजदरात सवलत –

बँकेने कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर (On a credit score) आधारित व्याजदरात सवलत दिली आहे. साधारणपणे, सवलतीचे व्याज दर (Interest rate) निश्चित मर्यादेच्या कर्जासाठी लागू असतात आणि ते कर्जदाराच्या व्यवसायाशी जोडलेले असतात. या वेळी आम्ही ऑफर सुलभ केली आहे असल्याचे SBI च्या व्यवस्थापकीय संचालकाने सांगितले आहे. यासह कर्जदारांच्या व्यवसायाची पर्वा न करता लोकांच्या सर्व घटकांना विचार करून ऑफर्स आणली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button