स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..
Want to build a business on cheap credit? So you must know about this plan.
व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 21 ऑगस्टला जगभरात ‘वर्ल्ड एंटरप्रेन्युअर डे’ साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी प्रधानमंत्री मुद्रा योजना (mudra yojna) राबवत आहेत. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल. भांडवल नसेल तर तुम्ही कमी व्याजदराने कर्ज (low interest loan) घेऊ शकता. मोदी सरकार तुम्हाला 10 लाखाची मदत करेल. तर जाणून घेऊया कसे मिळतील पैसे..
पात्र व्यक्ती..
कृषी संबंधित जे काही व्यवसाय करत असतील जसे की मत्स्य पालन, मधमाशी पालन, कुक्कुट पालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, डेअरी, कृषी उद्योग एकत्रीकरण, मत्स्य पालन, कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र, खाद्य आणि कृषी-प्रक्रिया,कापणी इत्यादी व्यावसायिक प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत पात्र आहे.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे लाभार्थी..
प्रोप्रायटर, पार्टनरशिप, सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या, मायक्रो उद्योग, दुरूस्ती दुकाने, खाण्यासंबंधी व्यापार, विक्रेते, ट्रक मालक, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म इ. (Proprietors, Partnerships, Service Sector Companies, Micro Industries, Repair Shops)
तीन कॅटेगरीत कर्ज मिळते..
खालील 3 कॅटेगरी योजनेचा व्यावसायिक लाभ घेऊ शकतात.
- शिशु कर्ज योजना- यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
- किशोर कर्ज योजना– यामध्ये 50,000 रुपये ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळते.
- तरुण कर्ज योजना– यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेचा लाभ घेऊन आपले व्यवसाय उभारू शकता मोठे वाढवू शकता.
वाचा : महाराष्ट्र राज्यात प्रथमच केबल शेडला मिळणार तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान -कृषी आयुक्त
अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे लक्षात ठेवा..
- कर्जासाठी ओळखीचा पुरावा – वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, फोटो आयडी.
- पत्त्याचा पुरावा – टेलीफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसेप्ट, आधार कार्ड, पासपोर्ट. अर्जदाराचा फोटो (6 महिन्यापेक्षा जुना नसावा).
- जातीचा दाखला SC/ST/OBC.
- ओळखीचा दाखला/ बिझनेस एंटरप्रायसेस, हे कागदपत्र आवश्यक आहेत.
- अर्ज करण्यासाठी www.mudra.org.in या वेबसाइट ला भेट द्या.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :