
Agribusiness | भात, गहू, हरभरा ही पारंपरिक पिके घेऊनच ते चांगले आर्थिक (Financial) उत्पन्न मिळवू शकतात, असा समज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. पण असं नाही, त्यांना हवं असेल तर अक्रोडाची लागवड (Walnut Cultivation) करून देखील लाखांत नफा कमावता येतो. भात, गहू, हरभरा यापेक्षा अक्रोड महागात विकला जातो. यासोबतच बाजारात देखील याला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) याची लागवड करण्यास कोणतीच अडचण नाही.
हवामान
कृषी तज्ज्ञांच्या मते, अक्रोडाची लागवड (Cultivation) उष्ण आणि थंड अशा दोन्ही हवामानात करता येते. विशेष म्हणजे 20 ते 25 अंशांमधले तापमान त्याच्या लागवडीसाठी चांगले मानले जाते. अशा तापमानाच्या ठिकाणी अक्रोडाची लागवड (Crop Insurance) केल्यास बंपर उत्पादन मिळते. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या शेतात (Department of Agriculture) अक्रोड लावत आहात, तिथे पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी.
लागवड
नर्सरीमध्ये अक्रोडाची रोपेही तयार केली जातात. रोपवाटिकेत त्याचे रोपटे तयार करण्यासाठी कलम पद्धतीचा वापर केला जातो. विशेषत: जुलै आणि ऑगस्ट हे महिने रोपवाटिकेच्या तयारीसाठी चांगले मानले जातात. बिया पेरल्यानंतर त्याची रोपे दोन ते तीन महिन्यांत तयार होतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही रोपे आधीच तयार केलेल्या शेतात (Agricultural Information) डिसेंबर महिन्यापर्यंत लावू शकता.
माती
अक्रोड लागवडीसाठी चिकणमाती माती चांगली मानली जाते. माती भुसभुशीत असेल तर उत्तम. अक्रोडाचे पीक या प्रकारच्या जमिनीत चांगले उत्पादन देते. त्याचबरोबर अक्रोड लागवडीसाठी वेळेवर पाणी देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. अक्रोडाच्या रोपाला उन्हाळ्यात दर आठवड्याला आणि हिवाळ्यात 20-30 दिवसांनी पाणी द्यावे लागते. त्याची रोप पूर्णपणे विकसित होण्यासाठी 7-8 महिने लागतात. ते 4 वर्षांनीच फळ देण्यास सुरुवात करते. यानंतर सुमारे 25-30 वर्षे उत्पादन होत राहील.
वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
किती मिळतो नफा?
सध्या बाजारात अक्रोडाचा भाव 700 ते 800 रुपये किलो आहे. यानुसार शेतकऱ्यांना केवळ एका रोपातून 2800 रुपये उत्पन्न मिळू शकते. जर तुम्ही 100 रोपे लावली असतील तर तुमचे उत्पन्न लाखोंच्या घरात आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतमालासाठी एमएसपी कायदा लागू होण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; जाणून घ्या लागू झाल्यास काय होईल फायदा?
- अरे बाप रे! मृत्युपत्रात नाव असूनही मिळणार नाही संपत्तीचा वाटा, जाणून घ्या काय आहे नियम
Web Title: Just start farming once and earn profit for 30 years, know the specialty of the crop