ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Volvo Electric Car | ऐकूनच काळजाचा ठोकाचं चुकेल ना राव! ‘ही’ इलेक्ट्रिक कार देतेय 738 किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत…

Volvo Electric Car | Rao will not be worried just by hearing it! 'This' electric car offers a range of 738 km; Know the features and price…

Volvo Electric Car | स्वीडिश कार निर्माता कंपनी व्होल्वोने चीनमध्ये आपली पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक प्रीमियम एमपीव्ही EM90 लॉन्च केली आहे. ही कार 738 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

EM90 च्या डिझाइनमध्ये व्होल्वोची पारंपारिक शैली दिसून येते. (Volvo Electric Car) कारच्या समोरील बाजूस मोठा व्होल्व्हो लोगो, एक बंद ग्रिल, सिग्निचर एलईडी हेडलॅम्प आणि हॅमर LED DRL दिसतात. कारच्या मागच्या बाजूस व्हर्टिकल एलईडी टेललॅम्प्स, शार्क-फिन अँटीना आणि एक मोठी रियर विंडशील्ड दिसते.

कारमध्ये 3-लाइनमध्ये 6 प्रवासी बसू शकतात. इंटिरिअरमध्ये 15.4 इंचाचे टचस्क्रीन आणि 15.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये Bowers & Wilkins चे 21 स्पीकर्स, मल्टिपल एम्बियंट लाइट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ आहेत.

EM90 इलेक्ट्रिक एमपीव्हीला 116kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार 268bhp एवढी पॉवर जनरेट करते आणि 8.3 सेकंदांत 0-100 किमी प्रति तास इतकी वेग पकडते. कारची बॅटरी 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

वाचा : Electric Car Battery | तुम्हाला माहितीये का? इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचे आयुष्य किती असते? दीर्घकाळ टिकवण्यासाठी घ्या ‘अशी’ काळजी

EM90 चीनमध्ये लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीचा अंदाज आहे की ही कार चीनमध्ये लोकप्रिय होईल.

व्होल्वो EM90 ची काही वैशिष्ट्ये

  • 738 किमीची रेंज
  • 268bhp पॉवर
  • 8.3 सेकंदांची 0-100 किमी प्रति तासची वेग
  • 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होणारी बॅटरी
  • 15.4 इंचाचे टचस्क्रीन आणि 15.6 इंचाची स्क्रीन
  • Bowers & Wilkins चे 21 स्पीकर्स
  • मल्टिपल एम्बियंट लाइट्स
  • पॅनोरॅमिक सनरूफ

व्होल्वोची इलेक्ट्रिक कारची योजना

व्होल्वो 2030 पर्यंत आपली संपूर्ण कार लाइनअप इलेक्ट्रिक करणार आहे. कंपनीने 2025 पर्यंत जगभरात 5 लाख इलेक्ट्रिक कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा :

Web Title : Volvo Electric Car | Rao will not be worried just by hearing it! ‘This’ electric car offers a range of 738 km; Know the features and price…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button