VLF| इटलीची व्हीएलएफ स्कूटर भारतात दाखल|
VLF| पुणे, ८ जुलै २०२४: इटलीमधील प्रसिद्ध ‘टू व्हीलर’ ब्रँड ‘Velocifero’ (VLF) भारतात प्रवेश करत आहे. या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोल्हापूरमध्ये लवकरच उभारण्यात येणार आहे. पुढील सणासुदीच्या मोसमात या इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन आवृत्त्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
भारतीय भागीदारी:
व्हीएलएफने भारतीय बाजारात प्रवेशासाठी KAW Veloce Motors Pvt.Ltd. या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. KAW Veloce Motors ही कंपनी भारतात व्हीएलएफ स्कूटरची निर्मिती आणि वितरण करणार आहे. या परदेशी ब्रँडचे पहिले स्कूटर यंदाच्या दिवाळीपूर्वीच लॉंच होण्याची शक्यता आहे. हे स्कूटर टेनिस इलेक्ट्रिक स्कटरच्या स्वरूपात बाजारात येणार आहे.
वाचा:Agriculture Implements Scheme| लातूर जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी अनुदानित शेती अवजार योजना|
विस्तार योजना:
इटलीची व्हीएलएफ कंपनी भारतात आपले जाळे पसरवण्याची योजना आखत आहे. कंपनीला टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये आपले उत्पादन विकायचे आहे. यासाठी कंपनी सुरुवातीला 15 डीलरशिप सुरू करणार आहे आणि मार्च 2025 पर्यंत 50 डीलरशिप उभारण्याचे
इटलीची व्हीएलएफ कंपनी भारतात आपले जाळे पसरवण्याची योजना (Plan) आखत आहे. कंपनीला टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये आपले उत्पादन विकायचे आहे. यासाठी कंपनी सुरुवातीला 15 डीलरशिप सुरू करणार आहे आणि मार्च 2025 पर्यंत 50 डीलरशिप उभारण्याचे ठेवले आहे. कंपनी आपली स्कूटर ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनात ठेवणार आहे.
टेनिस ई-स्कूटरची वैशिष्ट्ये:
व्हीएलएफ दोन्ही मॉडेल्समध्ये 84 व्होल्ट क्षमतेच्या दोन चेंज करता येण्याजोग्या लिथियम बॅटरी पुरवणार आहे. पहिले मॉडेल 1500W क्षमतेच्या मोटरसह ताशी 45 किमीचा वेग धारण (holding) करल आणि एका चार्जिंगमध्ये 60 किमी अंतर पार करेल. शहरी भागात फिरण्यासाठी ही उत्तम बाईक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दुसरे मॉडेल 4000W क्षमतेच्या बॅटरीसह एका चार्जिंगमध्ये 100 किमी अंतर पार करू शकेल (ताशी 40 किमी वेगाने चालवल्यास). बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतील.
हाय टेन्सील स्टील फ्रेम असलेल्या Tennis 1500W चे वजन बॅटरीसह केवळ 88 किलोग्रॅम आहे. तर 4000W मॉडेलचे वजन 10 किलोग्रॅम जास्त आहे. दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. स्पीडोमीटरसाठी 5.5 इंचाचा डिजिटल TFT डिस्प्ले आहे. रायडरला तीन वेगवेगळ्या मोडमध्ये (इको, कॉन्फर्ट आणि स्पोर्ट्स) स्कूटर चालवण्याची सुविधा आहे. बाईकचे फ्रंट आणि रियर लाइट LED आहेत. या मॉडेल्सची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.