Vishwakarma Skill Scheme | सोनार, कुंभार, चांभार, सुतारासह ‘या’ 18 पारंपारिक व्यवसायातील कारागीरांना 2 लाख रुपयांचे कर्ज जाणून घ्या कसे ?
Vishwakarma Skill Scheme | Find out how to get Rs 2 lakh loan for these 18 artisans in traditional trades including goldsmith, potter, chambar, carpenter.
Vishwakarma Skill Scheme | सोलापूर, 26 ऑक्टोबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्थेत पारंपारिक कारागीरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कारागीरांना “विश्वकर्मा” म्हणून संबोधले जाते. सोलापूर जिल्ह्यातील 18 पारंपारिक व्यवसायातील कारागीरांना (Vishwakarma Skill Scheme) प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.
या योजनेसाठी पात्रता असलेले कारागीर जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर, सरपंचांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, या योजनेसाठी पात्र पारंपारिक व्यवसायातील सर्व लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय व सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत. तसेच, या योजनेच्या प्रचार व प्रसार करून पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
वाचा : PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज
योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- स्वंयरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेतील 18 व्यवसायांपैकी कुटुंब आधारित पारंपारिक कारागीर नोंदणीसाठी पात्र असेल.
- लाभ प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले होय.
- लाभार्थीचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- जर एखाद्याला योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल, ज्यामध्ये त्याने नोंदणीवेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली होती.
- मागील 5 वर्षांत स्वंयरोजगार तथा व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. (उदा. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे PMEGP/CMEGP आणि PM SVANIDHI तथापि MUDRA)
- PM SVANIDHI चे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे, ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असतील.
- सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या यो
जनेअंतर्गत पात्र असणार नाहीत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावीत :
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- नोंदणी फॉर्म
- व्यवसायाचे प्रमाणपत्र
- व्यवसाय कर्जाची आवश्यकता दर्शवणारा प्रस्ताव
योजनेचा लाभ घेतल्यास कारागीरांना त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
हेही वाचा :
Web Title : Vishwakarma Skill Scheme | Find out how to get Rs 2 lakh loan for these 18 artisans in traditional trades including goldsmith, potter, chambar, carpenter.