इतर

Viral |गावकऱ्यांनीच काढलंय विकायला गाव; जाहिराती देखील केल्या प्रदर्शित.. काय आहे नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचाच..

पंढरपूर: गावकरी गावातील जमीन, जनावरे, शेती उपयोगी साधने,ट्रॅक्टर, भाजीपाला,दूध विकलेल ऐकलंय. परंतु गावकरीच आपलंच गाव विकू लागलेत. खर तर ही अतिशयोक्ती वाटत असली तरीही ही संवेदनशील बाब आणि खरी घटना (information) आहे.

पंढरपूर तालुक्यातील कुंभारगावाच्या ग्रामपंचायत अधिपत्याखाली येणारे घरतवाडी हे गाव आता गावकऱ्यांनीच विकायला काढल्याची बातमी पुढं आलीय. हे गाव जवळ जवळ चारशे ते साडे चारशे लोकांचं आहे. हेच गावकरी हे गाव विकण्यासाठी अनेक ठिकाणी ‘गाव विकणे आहे’. अशी जाहिरात(information) केलीय.

वाचा: शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीच मोठं गिफ्ट ! या योजनेसाठी 90 टक्के अनुदान…

खडकाळ रस्त्यांमुळे दोन गरोदर महिलांचे नुकसान; गावकऱ्यांचा संताप :

या गावात सुखसुविधा रस्त्यांची बोंबाबोंब दिसून येते असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की; येथील नेत्यांनी कोणतीही सुविधा केली नाही. रस्त्यांची बोंबाबोंब आहे. खडकाळ रस्त्यांची काम अजूनही केली नाहीत. यामुळे गावकऱ्यांना प्रवास करताना नाकी नऊ (information) येतं.

तसेच या रस्त्यांमुळे काही अपघात देखील झालेत. काही मुलांच्या पायांना इजा झाली तसेच दोघा जणांचे पाय मोडले असल्याचं गावकरी म्हणाले. एखादी महिला गरोदर असेल तर खूप त्रास (information) होतो. वेळेत गाडी या रस्त्यामुळे रुग्णालयात पोहचत नाही. यामुळे दोन गरोदर महिलांचे नुकसान देखील झाल आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button