राशिभविष्य

Vat purnima vrat 2022 | पतीचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी करतात वटपौर्णिमेचे व्रत, जाणून घ्या पूजा अन् वैज्ञानिक महत्त्व

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक सण समारंभ उत्साहात पार पडतात. वटपौर्णिमा (vatpaurnima) हे यातीलच एक पवित्र व्रत मानले जाते.

Vat purnima vrat 2022 | या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या आरोग्यासाठी (Health) उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करून पतीला दीर्घायुष्या लाभावे म्हणून प्रार्थना केली जाते. वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व आर्थिक समस्या (economical problem) दूर होतात. असे म्हंटले जाते. यावर्षी १४ जून रोजी हे व्रत करण्यात येणार आहे.

Pooja Muhurat | वटपौर्णिमा व्रत तिथी आणि पूजा मुहूर्त
ही पौर्णिमा १३ जून रोजी दुपारी १:४२ ते १४ जून रोजी सकाळी ९:४० पर्यंत असेल. यामध्ये यामध्ये १४ जून रोजी सकाळी ९:४० वाजून ४० मिनिटांनी शुभ योग सुरू होऊन १५ जूनच्या पहाटे ५:२८ पर्यंत राहील. १४ तारखेलाच पूजेचा शुभ मुहूर्त (Shubh Muhurt)असून या दिवशी खूप चांगला योग आहे.

वाचाVastu Tips | घराच्या ‘या’ दिशेला लावावे निशिगंधाचे झाड, सकारात्मक ऊर्जेसह मिळेल धनलाभ

Process of vatpaurnima pooja | पूजेची पद्धत
वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या स्त्रिया पवित्र स्नान करून वटवृक्षाजवळ सौभाग्याच लेणं घेऊन जातात. यानंतर वटवृक्षाभोवती कच्चा कापूस गुंडाळून,पाणी अर्पण करून हळद कुंकू वाहतात. वटवृक्षाला चंदन लावून त्याची विधिवत पूजा करतातआणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. याशिवाय वडाला फेरे मारण्याची देखील प्रथा आहे. ‘सावित्रीने सत्यवानाचे प्राण कसे वाचविले होते’ याच्या कथाही यावेळी वाचल्या जातात.

Scientific Importance| वैज्ञानिक महत्त्व
वडाचे झाड हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. वडाचे झाड सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. हे झाड खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्सर्जित करते. याचा फायदा स्त्रियांच्या उत्तम आरोग्यासाठी होतो. या वैज्ञानिक महत्त्वामुळे वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

वाचाAstrology | तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात, नोकरी मिळत नाहीये? तर ‘या’ रत्नाची घाला अंघटी, लगेच मिळेल गुडन्यूज

Strong relationship Bonds| नाती जपली जातात
हे व्रत स्त्रिया त्यांच्या पतीसाठी करत असतात. यामुळे पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होते. याशिवाय अशा सण उत्सवाच्या वेळी अनेक स्त्रिया कामातून वेळ काढून पूजेच्या ठिकाणी एकत्र येतात. त्यावेळी गप्पा-गोष्टी होतात यामुळे कळत नकळत मैत्रीच्या नात्यातील बंध सुद्धा जपले जातात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button