ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

वटपौर्णिमा : सौभाग्यवती स्रिया आजच्या दिवशी वडाचीच पूजा का करतात? जाणून घ्या; वडाच्या झाडाचे फायदे!..

vat purnima: Fortunately, why do women worship Vadachi today? Learn; Benefits of Vada tree .. ..

जन्मोजन्मी हाच पती मिळावा, म्हणून हिंदू धर्मामध्ये वट पौर्णिमा हा सण साजरा केला जातो, हे व्रत केल्यावर पदली ला उदंड आयुष्य लाभो हि मागणी स्त्रिया वडाकडे करत असतात.हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया उपवास करतात, व पतिला उत्तम आरोग्य लाभावे अशी त्यामागची धारणा असते. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा का करतात, चला पाहूया वडाच्या झाडाचे गुणधर्म,..

वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते.

वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे. पौराणिक कथेनुसार हे झाड इतके पवित्र आहे की त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचा वास असतो.

हेही वाचा :smart technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!

[metaslider id=4085 cssclass=””]

आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करते म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.

झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.

या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.

हेही वाचा :Crop insurance: शेतकऱ्यांना मिळेल का न्याय? पिकविम्या मध्ये मोठी तफावत वाचा सविस्तर बातमी…

वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य-
सावित्री आणि सत्यवानची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद-कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू

वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त-
– वट पौर्णिमा व्रत तिथी – 24 जून 2021

– पौर्णिमा तिथी प्रारंभ – 24 जून सकाळी 3 वाजून 32 मिनिटांपासून

– पौर्णिमा तिथी समाप्त – 25 जून सकाळी 12 वाजून 9 मिनिटांपर्यंत

हेही वाचा

जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?

खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button