आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…
Vaccination against snake bites in animals now costs only one rupee - Animal Husbandry Department decision
कोल्हापूर: जनावरांना होणारा घटसर्प आजार पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) लसीकरण (Vaccination) सुरू केले आहे. पावसाळ्या मधील काळामध्ये जनावरांमध्ये अधिक प्रमाणात हा आजार दिसून येतो. या आजारामुळे अनेक जनावरे देखील दगवत असतात.
मात्र या वर्षी पशूसंवर्धन विभागाने लसीकरण सुरू केली आहे, या लस करण्यासाठी येणारा खर्च केवळ एक रुपयात इतकाच होणार आहे.
मागील तीन चार वर्षांमध्ये घटसर्प ( Ghatsarp) या आजारामुळे पूरक्षेत्रात जवळपास १५०० वर जनावरे दगावली आहेत त्याला प्रतिबंध करणारे हे लसीकरण शेळी, मेंढ्यांना करून घ्यावे. तत्पूर्वी शेळी, मेंढीला जंताचे औषध द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
आंतरविशार (Introspection) हा आजारही शेळी, मेंढ्यांना अतिप्रमाणात ओला चारा खाल्ल्यानंतर शौचाला वाढणे, ताप येणे, शेळी व मेंढी दगावणे असेही दिसते. त्यामुळे घटसर्प व आंतरविशार प्रतिबंधक लसीकरण करून घेणे हिताचे ठरते.
हेही वाचा: व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
सद्या पावसाला सुरूवात झाली आहे तरी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे, या साठी वेळेत जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत जनावरांना घटसर्प सारख्या रोगांवर उपचार केल्यास जनावरे वाचू शकतात.
हेही वाचा:
१)Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…