Training| उत्तर प्रदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतंय प्रशिक्षण, उत्पादन वाढीला मिळणार चालना
Training| मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण (important) पाऊल म्हणून राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना शाहजहांपूर ऊस संशोधन संस्थेत आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मुझफ्फरनगर ऊस संशोधन परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात आतापर्यंत 128 कार्यक्रम पूर्ण झाले असून त्याद्वारे 10 हजार 82 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राज्य सरकारचे प्रयत्न
उत्तर प्रदेश सरकारने गेल्या काही वर्षांत ऊस, इथेनॉल आणि साखर उत्पादनात मोठे यश मिळवले आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या सहकार्याने ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आणि पीक खर्च कमी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे साखर उद्योगात मोठी प्रगती झाली आहे
काय शिकवले जात आहे?
या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना ऊस लागवड, खत-पाणी व्यवस्थापन (Management) , रोगांची प्रतिबंधात्मक उपाययोजना, नवीन ऊस जाती, इत्यादींबाबत माहिती दिली जात आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाची लागत कमी करण्याचे मार्ग आणि त्यातून अधिक नफा कमावण्याचे मार्गही शिकवले जात आहेत.
शेतकऱ्यांसाठी फायदे
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकरी ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यास सक्षम होतील. त्यांचा खर्च कमी होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. परिणामी (Consequently), शेतकऱ्यांचे आर्थिक भवितव्य