UPI पिन चा वापर करताय? तर सावध राहा; डिजिटल व्यवहारामध्ये होऊ शकते फसवणूक..
भारतातील लोक डिजिटल व्यवहारासाठी (Digital transactions) UPI चा भरपूर वापर करतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) ही देशातील किरकोळ पेमेंट (Payment) आणि सेटलमेंट सिस्टमच्या कामकाजासाठी एक व्यापक संस्था आहे. हा रिझर्व्ह बँक (Reserve Bank) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (Indian Banks Association) चा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारतात मजबूत पेमेंट आणि सेटलमेंट फ्रेमवर्क तयार करणे आहे. NPCI चा युनिफाइड पेमेंट इंटरफेस एका मोबाईल .अप्लिकेशनला (application) अनेक बँक खात्यांशी जोडून आर्थिक व्यवहार सुलभ करतो. UPI काय आहे? कित्ती सुरक्षित आहे? वापर कसा केला पाहिजे? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..
UPI म्हणजे काय? किती सुरक्षित आहे?
यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments interface) ही एक आंतरबँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे, ज्याद्वारे फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने स्मार्टफोनवर पेमेंट (Payment) करता येते. वापरकर्ते काही मिनिटांत घरी बसून UPI मधून पैसे हस्तांतरित करतात. पण प्रश्न असा आहे की, यूपीआय किती सुरक्षित (Safe) आहे? डिजिटल व्यवहार (Digital transactions) ग्राहकांसाठी फायदेशीर तर आहेतच पण त्यांच्यासाठी धोकाही असतो. त्यामुळे सावध राहिले पाहिजे. ते कसे? पाहुया..
हे ही वाचा –
हकर्सचे प्रमाण वाढले –
देशात तंत्रज्ञानाच्या (technology country) प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूक (Online fraud) झपाट्याने वाढत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नवीन पद्धती वापरत असतात. सायबर क्राइमच्या (cyber crime) घटना दररोज समोर येत आहेत, ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गहाळ झाले आहेत. सावध कसे राहिले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
UPI पिन फक्त सुरक्षित अप्लिकेशनवर वापरा
UPI पिन जपून ठेवा कारण यामुळे फसवणूक होऊ शकते. सावधगिरीसाठी, UPI पिन फक्त BHIM UPI सारख्या सुरक्षित अप्लिकेशन (Secure application) वर वापरा. UPI पिन टाकण्यासाठी कोणत्याही वेबसाइट किंवा फॉर्ममध्ये लिंक असल्यास पिन टाकणे टाळा.
फक्त पैसे पाठवण्यासाठी UPI पिन टाका –
पैसे (Money) पाठवायचे असतील तेव्हाच UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल. जर तुम्हाला कुठून पैसे मिळत असतील आणि त्यासाठी तुमच्याकडे UPI पिन मागितला जात असेल तर इथे सावध राहा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. जर आपल्याला पैशांचा व्यवहारात (transaction of money) कोणतीही समस्या येत असेल आणि आपल्याला ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याची आवश्यकता असेल तर फक्त पेमेंट अप्लिकेशनच (Payment application) वापरा. सत्यापित नसलेल्या इंटरनेटवर (internet) दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू नका.
UPI पिन गुपित ठेवा –
UPI पिन ATM पिन सारखाच असतो. त्यामुळे ते कोणाबरोबरही शेअर करू नका. फसवणूक (Cheating) होण्याची शक्यता अधिक असते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –