कृषी तंत्रज्ञान

इंधन बचतीचा महामंत्र; वापरा ट्रॅक्टर निवडीचे हे तंत्र..

Use the mantra of fuel saving. This is the technique of choosing a tractor.

ट्रॅक्टर निवड करताना हवामानाची स्थिती, पीक पद्धती जमिनीचा प्रकार, गिअर ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर मिळणारी सुविधा, अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो ट्रॅक्टरचे योग्य निवड केल्यास त्याचप्रमाणे योग्य काळजी घेतल्यास इंजिनामध्ये 10 ते 15 टक्के पर्यंत बचत होऊ शकते.

ट्रॅक्‍टरची अश्‍वशक्ती: (Tractor horsepower) ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकजण ट्रॅक्‍टरची अश्‍वशक्ती तपासून घेत असतो, ट्रॅक्टरचे अश्वशक्ती ठरविताना जमीन कोरडवाहू आहे की बागायती आहे या गोष्टीचा विचार करावा लागतो उदाहरणार्थ : (एक पिक पद्धती कोरडवाहू जमीन)

एक अश्वशक्ती = दोन हेक्टर, 100 एकर = वीस ते पंचवीस इतकी अश्वशक्ती ट्रॅक्टर मध्ये हवी. दुबार पीकपद्धती ( जमीन ओलिताखाली ) एक अश्वशक्ती =1.5 हेक्टर, 100 एकर = 30 ते 35 अश्वशक्त.

गिअर संख्या : (Gear number)
ज्या ट्रॅक्टर मध्ये कमी गिअरमध्ये जास्त वेगवान मिळत असेल तो ट्रॅक्टर शक्यतो निवडावा.

डीझेल क्षमता : (Diesel capacity)
ट्रॅक्टर निवड करताना इंजिनाचा देखील विचार करणे आवश्यक आहे.

वाचा : ‘सीएनजी’ ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा!

ट्रॅक्टरची निगडित योग्य अवजारे : (The right tools for tractors) जास्त गीअरची संख्या असेल सलग दोन गिअरमधील वेगाचा फरक असल्यास तो ट्रॅक्टर चांगला आहे. ट्रॅक्टरच्या अश्वशक्ती नुसार ट्रॅक्टरच्या अवजाराची निवड केल्यास वेळेमध्ये बचत (Savings) होते म्हणजेच प्रति तास 20 ते 40 टक्के अधिक काम होईल अश्वशक्तीनुसार योग्य ट्रॅक्टरचे अवजारे निवड केल्यास इंधनामध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.

वाचा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

ट्रॅक्टरची निगा कशी राखाल? (How to take care of a tractor) ट्रॅक्टरचे योग्य देखभाल केल्यास इंधनामध्ये बचत होते तसेच ट्रॅक्टर देखील दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहू शकतो. चुकीच्या अवजारांची निवड केल्यास 25 टक्‍क्‍यांपर्यंत इंधन (Fuel) वाया जाऊ शकते. इंजिनचे कम्प्रेशन प्रेशर, इंजेक्ट प्रेशर,व्हाल, क्लिअरन्स इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे. डिझेलची (diesel) साठवण टाकी स्वच्छ असावी, डिझेल गळती होत नाही याची काळजी घ्यावी, ट्रॅक्टर कंपनीने सांगितल्याप्रमाणे फिल्टर (Filter) बदलत रहावेत. इंजिन ऑइल, फिल्टर ऑइल योग्य कालावधीमध्ये बदलावेत. इंजिन ऑइल फिल्टर वापरताना चांगल्या कंपनीचे ऑईल वापरले जाईल याची दक्षता घ्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button