ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Astrology | तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात, नोकरी मिळत नाहीये? तर ‘या’ रत्नाची घाला अंघटी, लगेच मिळेल गुडन्यूज

आज आपण एखाद्या शैक्षणिक कोर्सची माहिती घेण्याअगोदर त्यातील नोकऱ्यांची संधीबद्दल विचारपूस करतो. कारण, आजच्या काळात नोकरी मिळणं हे खूप महत्वाचे झाले आहे.

Astrology | पहिल्या काळात शिक्षण घेतल्याशिवाय नोकरी (job) मिळणार नाही असे म्हणले जायचे. मात्र, काळानुसार आता शिक्षण (Education) घेतल्यानंतरही नोकरी मिळते का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? नोकरीसाठी फक्त मेहनत कामाची नसून त्यासाठी नशीबानेही साथ देणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, ज्योतिष शास्त्रात (Astrology) नोकरी मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्योतिष शास्त्रातील हे उपाय केल्यानंतर नक्कीच यश आपल्याला लागू शकते.

या’ रत्नांचा वापर टाळा
ज्योतिष शास्त्रात रत्न (Gem) धारण करण्यापूर्वी अनेक सूचना दिल्या आहेत. रत्नांपैकी प्रामुख्याने नऊ रत्ने जास्त परिधान केली जातात. सूर्यासाठी माणिक, चंद्रासाठी मोती, मंगळासाठी प्रवाळ, बुधासाठी पन्ना, गुरूसाठी पुष्कराज, शुक्रासाठी हिरा, शनिसाठी नीलम, राहूसाठी गोमेद, केतूसाठी लसूण. जर तुम्हाला नोकरी संबंधित काही अडचणी आणि समस्या असतील तर सर्व प्रकारची रत्ने वापरण्यात काही फायदा नाही. नोकरीत जर यश हवे असेल तर माणिक रत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वाचा: Astrology Tips | घरात-दारात चप्पल उलटी ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध, यामुळे होतात ‘हे’ भयानक दुष्परिणाम

नोकरीसाठी वापरा ‘हा’ रत्न
नोकरी मिळवण्यासाठी आणि नोकरीत पदोन्नती किंवा सरकारी विभागातून लाभ मिळवायचे असल्यास त्या व्यक्तीने माणिक रत्न धारण करावा. माणिक हा रत्न सूर्याचा रत्न मानला जातो. सूर्य हा नोकरी, करिअर यांचा कारक ग्रह मानला जातो. माणिक रत्न परिधान केल्यास पराक्रम, साहस निर्माण होऊ शकतो. तसेच, प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी माणिक रत्न धारण करावे, असा सल्ला दिला जातो.

वाचा: Astrology | ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार आज चांगले यश, तर बाकी राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी

माणिक्य रत्नाचा लाभ
सरकारी खात्यात नोकरीत बढती आणि फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून रुबी स्टोन घालू शकता. त्यामुळे सूर्यदेव बलवान होतात. तसेच, व्यक्तीचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊन व्यक्तीस प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. माणिक रत्न धारण केल्यास रक्तासंबंधी व्याधी दूर होतात.

(टिप: सदर माहिती ज्योतिष शास्त्रानुसार आहे, याबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button