इतर

Update | तुम्ही देखील अजून’ क्रोम ब्राऊजर ‘ नाही केलं अपडेट तर त्वरित करा ; जाणून घ्या या मागील कारण

Update | आपल्याला माहीतच आहे की आपण सर्वजण इंटरनेटवर माहिती सर्च करण्यासाठी गुगल क्रोम ब्राऊजरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच हे ब्राऊजर वापरण्यास सोपे असून त्यातील अनेक फीचर्स हे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतात. परंतु आता क्रोम ब्राऊजर वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

तसेच गुगलने क्रोम आता वापरकर्त्यांना मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. गुगल एका बग बाबत वापरकर्त्यांना सतर्क करत असून , तो उपकरणासाठी हानीकारक असल्याचे देखील सांगितले जात आहे.

वाचा: गावकऱ्यांनीच काढलंय विकायला गाव; जाहिराती देखील केल्या प्रदर्शित.. काय आहे नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचाच.

काय आहे सीव्हीई – २०२२ – ३७२३?

आता सध्या अवास्टच्या सुरक्षा संशोधकांनुसार, सीव्हीई – २०२२ – ३७२३ हे क्रोमच्या व्ही ८ जावा स्क्रिप्ट इंजिनशी संबंधित टाईप कन्फ्युजन ही समस्या आहे. त्यामुळे हानी पोहचवू इच्छिणारी व्यक्ती आर्बिटरी कोड मिळवण्यासाठी वापरकर्त्याच्या ह्या डिव्हाइसमधील टाईप कन्फ्युजन त्रुटीचा फायदा घेऊ शकते. तसेच आर्बिटरी कोडच्या मदतीने वापरकर्त्याच्या सिस्टिममध्ये प्रवेश मिळवता येते.

क्रोम युजर्सनी काय करावे?

त्यामुळे गुगलने यावर उपाय शोधला आहे. तसेच हानीकारक बगपासून सुरक्षेसाठी कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. तसेच गुगलने अलिकडेच क्रोम १०७ अपडेट उपलब्ध केला आहे. क्रोम ब्राऊजर अपडेट केल्यास क्रोम ब्राऊजर अपडेट केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

वाचा: सामान्यांना खुशखबर ! दिवाळीनंतर लगेच सर्वात प्रथम तब्बल ‘एवढ्या’ जास्त रुपयांनी एलपीजी गॅस स्वस्त ..!

गुगल क्रोम कसे अपडेट करावे?

आता गुगल क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यासाठी क्रोम पेजच्या वरच्या भागात उजव्या बाजूला असलेल्या ३ डॉट्सवर क्लिक करा. तसेच यात सेटिंग्सवर क्लिक करा. परंतु त्यानंतर उजव्या बाजूला ‘लुक फॉर अबाऊट क्रोम’ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. पण याने नवीन अपडेट उपलब्ध आहे की नाही याबाबत कळेल. मग अपडेट उपलब्ध असल्यास त्यावर क्लिक करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : If ‘Browser’ and ‘Chrome’ have not been updated, do so immediately; Know the reason behind this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button