हवामान

Unseasonal Rain | बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट! पुढचे 2 दिवस शेतकऱ्यांच्या पिकाला धो-धो झोडपणार पाऊस; जाणून घ्या कुठे?

Unseasonal Rain | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे. आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यवतमाळ वगळता आज कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही.

यवतमाळमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात पहाटेपासून विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. कळंब, बाभूळगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे बुलढण्यात सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे.

वाचा : Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात अवकाळी पावसाचा धोका! पुढच्या ३-४ तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. यावर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Web Title: Baliraja’s heavenly crisis again! Next 2 days rain will wash away farmers’ crops; Know where?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button