हवामान

Unseasonal Rain | या राज्यात अवकाळी पावसामुळे पूरसदृश परिस्थिती; शेकडो घरे पाण्याखाली, महाराष्ट्राला किती धोखा?

Unseasonal Rain | Flood-like situation due to unseasonal rains in this state; Hundreds of houses under water, how much fraud to Maharashtra?

Unseasonal Rain | तामिळनाडूत अवकाळी पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मागील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलं आहे.(Unseasonal Rain) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत.

तामिळनाडूतील थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पावसामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या रस्त्यावरच अडकून पडल्या आहेत.

वाचा : Maharashtra Winter | महाराष्ट्रात थंडीचा बाजार थंड, रब्बीच्या आशा कायम; जाणून घ्या सविस्तर …

हवामान खात्याने आज देखील तामिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात पूरस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

तामिळनाडू सरकारने अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत केली जात आहे.

सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : Unseasonal Rain | Flood-like situation due to unseasonal rains in this state; Hundreds of houses under water, how much fraud to Maharashtra?

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button