ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Unseasonal Rain | शेतकऱ्यांनो राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार का वाढणार? त्वरित जाणून घ्या एका क्लिकवर

Farmers, why will the force of unseasonal rain decrease in the state and increase? Know instantly in one click

Unseasonal Rain | राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला होता. यामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या (2 डिसेंबर) मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल.

मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात उद्यापर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. परंतु परवा रविवारी 3 डिसेंबरपासून तिथे पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 4,5 डिसेंबर असे दोन दिवस फक्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर 6 डिसेंबरपासून मराठवाड्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भ
विदर्भातील 11 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तिथेही बुधवार दिनांक 6 डिसेंबरपासून पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल. दरम्यान, सोमवार दिनांक 4 डिसेंबरला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी सीमावर्ती भागात आदळणारे ‘ मिचोंगं ‘ नावाचे सौम्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही विशेष वातावरणीय परिणाम जाणवणार नाही.

वाचा : Ration Card | मोदी सरकारचा गरिबांसाठी मोठा निर्णय! ‘इतके’ वर्ष मिळणार मोफत रेशन अन् महिलांना दरमहा 15 हजार; वाचा निर्णय

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेली पीक अवकाळी पावसामुळे शेतातच कोलमडून पडली आहे. त्यामुळे या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक ठिकाणी फळबागांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Farmers, why will the force of unseasonal rain decrease in the state and increase? Know instantly in one click

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button