ताज्या बातम्या

दुर्दैवी: “पावसामध्ये” मोबाईल वापरणे टाळा! मोबाईल नेटवर्कच्या शोधार्थ मुले झाडावर चढली व वीज पडून एकजण मृत्युमुखी, वाचा सविस्तर बातमी…

Unfortunate: Avoid using mobile "in the rain"! In search of mobile network, children climbed a tree and one died due to lightning, read detailed news

मोबाईल नेटवर्कच्या (Of mobile networks) शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात सोमवार, 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास झाडावर वीज पडून हा अपघात घडला.

मानकरपाडा येथील काही मुलं मोबाईल रेंज मिळण्यासाठी उंबराच्या झाडावर (On the threshing floor) चढली होती. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज पडली पडल्याने रविन बच्चू कोरडा (वय 17 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. चेतन मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) आणि मेहुल अनिल मानकर (वय 12 वर्षे) हे जखमी आहेत. पावसाळ्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी वीज पडून मनुष्यहानी होते, यासाठी बचाव आणि सुरक्षा (Rescue and security) आणि गोष्टींचे पथ्य पाळले तर अशा घटना टाळता येऊ शकतात.

[metaslider id=4085 cssclass=””]

बऱ्याच वेळा पाऊस जोरदार पडत असल्याने, पावसापासून बचाव होण्याकरिता झाडाचा आसरा घेतात परंतु वीज नेमकी झाडावर पडते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.विजा चमकत असल्यास घराचे दारे,खिडक्या बंद करून ठेवावे, तसेच घरापासून कुंपण देखील लांब अंतरावर असावे.

मेघगर्जना चालू झाल्यास, घरांमध्ये कमीत कमी 30 मिनिटे आत मध्ये रहावे, शकतो बाहेर जाणे टाळावे.कदाचीत आपण बाहेर असाल तर, झाडाखाली न थांबता मजबूत इमारतीच्या दिशेने पळ काढावा. मेघगर्जनेच्या वेळी ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे. गाड, ट्रॅक्टर (Gad, tractor) चालवत असलेल्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.

जोरदार पाऊस चालू झाल्यास घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (Phones, mobiles, electrical appliances should not be connected to electrical connections.) तसेच कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये जसे की इस्त्री, मोबाईल

उंच जागांवर, टेकडीवर ,मोकळ्या जागेवर, समुद्रकिनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे, बस, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी गोष्टी पासून दूर रहावे. लटक्या तारा किंवा विद्युत खांब यापासून देखील दुरावे व सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही.

श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलाही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाच्या हृदयाची गती सीपीआर करून सुरू ठेवावी.

हेही वाचा :


भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button