भेंडी आणि मिरचीचे नवीन वाण –
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV, Akola) निर्मित मिरची (Chilli) ‘पीडीकेव्ही हिरकणी’ (PDKV Hirkani ) आणि भेंडी पिकाचे ‘पीडीकेव्ही प्रगती‘ (PDKV Pragati) असे वाण व्यावसायिक बीजोत्पादनानसाठी भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत. या दोन्ही वाणांची शिफारस ही खरीप हंगामासाठी केली आहे.
पीडीकेव्ही प्रगती (PDKV Pragati) ची वैशिष्ट्ये –
पीडीकेव्ही प्रगती’ या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकार, आकर्षक हिरव्या रंगाची भेंडी ही विषाणुजन्य केवडा रोगास मध्यमदृष्ट्या प्रतिकारक्षम असून त्याची उत्पादन क्षमता हेक्टरी १५० क्विंटलपर्यंत आहे.
पीडीकेव्ही हिरकणी (PDKV Hirkani ) ची वैशिष्ट्ये –
मिरचीचा पीडीकेव्ही हिरकणी हा वाण अपरिपक्व अवस्थेत असताना गर्द हिरवा रंग आणि परिपक्व अवस्थेत गर्द लाल रंगाचा असतो. कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हिरव्या मिरचीची उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी २५० ते ३०० क्विंटल आणि लाल मिरचीची उत्पादन क्षमता २५ ते ३० क्विंटल आहे. रोग आणि किडीस मध्यम प्रतिकारक असून मध्यम तिखटपणा आणि उत्तम लाल रंगाची पावडर मिळते.
वाचा: बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ
भरपूर प्रयत्न नंतर अखेर निवड –
मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एम. घावडे, सहायक प्रा. पी. पी. गावंडे, सहयोगी प्रा. डॉ. डी. टी. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाण निर्मितीसाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्तरावरील वाण निवड समितीला उद्यानविद्या विषयक वाणांची निवड करण्याचे अधिकार दिलेले आहेत. या समितीचे अध्यक्ष भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) डॉ. ए. के. सिंग होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या वाणांचे सादरीकरण करण्यात आले.
वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…
भारत सरकारच्या राजपात्रात वाणांची प्रसिद्धी –
२०१८ मध्ये झालेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या ज्वाइंट ॲग्रेस्कोमध्ये या वाणांची शिफारस झाली होती. त्याचवर्षी राज्य वाण निवड समितीने राज्यासाठी हे वाण प्रसारित केले होते. त्यानंतर आवश्यक कार्यवाहीनंतर हे वाण देशपातळीसाठी प्रसारित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. नुकतेच भारत सरकारच्या राजपत्रात या वाणांना प्रसिद्धी देण्यात आली. यामुळे पायाभूत बियाणे शेतकरी, बीजोत्पादक, कंपन्यांना विक्री करता येईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: