हवामान

आणखीन दोन दिवस बरसणार अवकाळी पाऊस: पुण्यासह “या” जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस…

Two more days of unseasonal rains and heavy rains in "this" district including Pune

गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाला (Untimely rain) सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) देखील होत आहे. पूर्व मोसमी पावसाने (Pre-monsoon rains) अनेक जिल्ह्यांध्ये हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना तर अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

हेही वाचापंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…

अजूनही अवकाळी पावसाचे संकट टळले गेले नाही, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गारपिटीचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. शनिवारी पुणे-अहमदनगर तसेच लासलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे.

हेही वाचा… पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…

त्यामुळे हवामान (Weather) खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच काढणीच्या पिकांनाताडपत्री किंवा इतर प्लास्टिकचं आवरण झाकावं असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

सोमवारी तारीख 3 पुण्यासह, दक्षिण महाराष्ट्र , मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाडा तेथे पावसाळी हवामान तयार झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, बीड, नगर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या गडगडाटांच्या साथीने मेघगर्जनेसह (With thunder) जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. (आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा आणि मिळवा महत्वाचे अपडेट)

हेही वाचा:
१) साखर कारखान्यांपुढे मोठा पेच! साखर विक्रीचे मोठे आव्हान, त्यामध्ये सरकारची काय असेल भूमिका ?
२) पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती… 3) कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button