बाजार भाव

Tur Rate | तूर उत्पादकांचे अच्छे दीन! बाजारात तुरीला मिळतोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या काय आहे दराची स्थिती?

Tur Rate | भारतात तुरीच्या डाळीला सामान्य वर्गाकडून प्रचंड मागणी मिळते. कारणं सामान्य नागरिकांचं दररोज जेवण हे वरण भातानेच पुर्ण होते. याचमुळे भारतात तुरीची लागवड (Tur Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मागणी पूर्ण करण्यासाठी तुरीची (Lifestyle) इतर देशातून आयात देखील केली जाते. तर सध्या तुरीला (Tur Rate) बाजारात चांगला दर मिळत आहे. यामुळे तूर उत्पादक (Financial) शेतकरी आनंदात आहेत.

यंदाचे तूर उत्पादन
यंदाच्या वर्षी तुरीच्या पिकाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा मोठा बसला आहे. याच कारणामुळे तुरीची लागवड होऊन देखील उत्पादनात घट होऊ शकते. जवळपास यंदा तूर उत्पादनात (Tur Production) 20 टक्के इतकी घट होऊ शकते. ज्याचा परिणाम दरावर होऊ शकतो. असा अंदाज जाणकरांनी बांधला होता. अगदी हाच अंदाज सत्यात उतरेल की काय असं चित्र निर्माण झालं आहे.

किती मिळतोय तुरीला दर?
सध्या देशातील बाजारात तुरीला चांगला दर मिळत आहे. अर्थात तूर तेजीत आहे. असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. ज्याचं कारण म्हणजे बाजारात तुरीची आवक घटली आहे. तुरीचे उत्पादन (Lifestyle) डिसेंबर महिन्यापासून मिळेल. त्यामुळे सध्या बाजारात तुरीचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात तुरीची आवक कमी (Insurance) असल्यामुळे सध्या तुरीला 7 हजार ते 8 हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

देशपातळीवरील तुरीचे दर
महाराष्ट्रातील दर 7 हजार 100 ते 8 हजार रुपये इतका आहे. कर्नाटकातील दर (Finance) देखील 6 हजार 800 ते 7 हजार 900 रुपयांवर स्थिर आहे. त्याचबरोबर लाल तूर सध्या 7 हजार ते 7 हजार 800 रुपयाने विकली जातेय. तर लेमन तुरीचा भाव 7 हजार 300 ते 7 हजार 500 रुपयांच्या जवळपास आहेत. एकंदरीत देशपातळीवर तुरीला चांगला दर मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळेल.

हेही वाचा:

Web Title: Achhe Deen of Tur producers! Turi is getting price in the market, know what is the price status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button