ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Tur Stock Limit | मोठी बातमी! केंद्र सरकारने तुरीवरील वाढवले स्टॉक लिमिट; जाणून घ्या दरात होणार का मोठी घट?

Big news! Central Govt Raises Stock Limit on Pipes; Know why there will be a big drop in the rate?

Tur Stock Limit | मागणी आणि पुरवठ्यातील तफावत तसेच बाजारात नवीन तूर येण्यास अद्याप बराचसा कालावधी आहे. त्यामुळे तुरीचे दर नियंत्रणासाठी पूर्वीचे स्टॉक लिमिट आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट झाली. त्यानंतरच्या काळात कृत्रिम टंचाईसाठी काही व्यापाऱ्यांकडून साठेबाजी करण्यात आल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तुरीचे दर क्विंटलमागे १२५०० ते १३००० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

तुरीच्या दरावर नियंत्रण
केंद्र सरकारकडून तुरीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी साठवणुकीवर मर्यादा आणण्यात आली आहे. सद्यःस्थितीत नागपूरच्या कळमना बाजारात तुरीला १०५०० ते ११००० रुपयांचा दर मिळत आहे. यंदाच्या खरिपातील तूर फेब्रुवारीपर्यंत बाजारात विक्रीला येणार आहे. परिणामी दर नियंत्रणासाठी घाऊक व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळी संस्थांना ५० टन स्टॉक मर्यादा लावण्यात आली आहे.

याशिवाय प्रक्रियादारांना एकूण क्षमतेच्या दहा टक्‍के साठ्याची मर्यादा आहे. यापूर्वी ही मर्यादा दुपटीने जास्त होती. आता साठेबाजी होऊ नये याकरिता पुरवठा व कृषी विभागाच्या माध्यमातून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाचा : ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

अमरावती बाजारातील दर
७ सप्टेंबर ः १०५०० ते ११०००
२६ सप्टेंबर ः ११५०० ते १२०००
२८ सप्टेंबर ः १०५०० ते ११६००
३ ऑक्टोबर ः १०७०० ते ११५००
७ ऑक्टोबर ः १०५०० ते १११००

तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी तुरीचे दर वाढल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षीही तूर भाव वाढू नयेत यासाठी सरकारने योग्य पावले उचलली आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात तुरीची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही किफायती दरात तूर उपलब्ध होईल.

हेही वाचा :

Web Title: Big news! Central Govt Raises Stock Limit on Pipes; Know why there will be a big drop in the rate?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button