Tur Rate | ब्रेकींग! ‘या’ तारखेपर्यंत तुरीवरील स्टॉक लिमिटची वाढवली मर्यादा; थेट दरावर होणार परिणाम
Breaking! Extended limit of stock limit on Turi till 'this' date; Direct rate impact By
Tur Rate | देशात तूर आणि उडदाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे. हे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तूर आणि उडदावरील स्टॉक लिमिटचा कालावधी दोन महिन्यांनी वाढवला आहे. तसेच स्टॉक मर्यादेत घट केली आहे. केंद्र सरकारने २ जून रोजी तूर आणि उडदावर स्टॉक लिमिट लावले होते. तेव्हा स्टॉक लिमिटची मर्यादा ३१ ऑक्टोबरपर्यंत होती.
तूर स्टॉक लिमिटची मर्यादा वाढवली
आता ती मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. विशेष म्हणजे उडदाची काढणी सुरू झाली असून शेतकऱ्यांचा मालही बाजारात येत आहे. नेमक याच काळात आता स्टॉक लिमिटची मर्यादा वाढवली. सरकारने प्रक्रियादार, घाऊक व्यापारी, मोठ्या विक्री साखळ्या असणाऱ्या संस्थांच्या स्टॉक मर्यादेतही कपात केली आहे. जून महिन्यात स्टॉक लिमिट लावले त्या वेळी घाऊक व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळ्या असणाऱ्या संस्थांना २०० टन स्टॉक मर्यादा दिली होती.
वाचा : Tur Stock Limit | बाजारात तुरीचे दर तेजीत! म्हणूनच सरकारने लावलं स्टॉक लिमिट; जाणून घ्या किती मिळेल दर आणि लिमिट?
मात्र ही मर्यादा आता कमी करून ५० टनांवर आणली आहे. तसेच प्रक्रियादारांसाठी पूर्वी तीन महिन्यांतील क्षमतेचे उत्पादन किंवा एकूण क्षमतेच्या २५ टक्के स्टॉक मर्यादा दिली होती. आता एक महिन्यातील उत्पादन क्षमता किंवा एकूण क्षमतेच्या १० टक्के स्टॉक मर्यादा केली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, स्टॉकमधील तूर आणि उडदाचा बाजारात पुरवठा वाढावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
भाव कमी होण्याची शक्यता
तसेच बाजारात ग्रहाकांसाठी तूर आणि उडदाची डाळ रास्त भावात उपलब्धता व्हावी यासाठी सरकारने स्टॉक लिमिटचा कालावधी वाढवला असून स्टॉक मर्यादाही कमी केली आहे. व्यापारी आणि प्रक्रियादारांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्टॉक लिमिट वाढवल्याने प्रक्रियादार आणि व्यापारी अडचणीत येतील. तसेच देशात तूर आणि उडदाचा स्टॉक कमी असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाही.
तुरीचे भाव
तुरीचे भाव गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत. सध्या तूर १४ ते १५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. उडदाचे भावही १२ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तूर आणि उडदाचे भाव कमी होतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Stamp Paper | मोठी बातमी! 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणारं बाद; गैरव्यवहारांना बसणार कायमचाच आळा
- Sugar Rate | आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची दरवाढ कायम! सातत्याने तब्बल ५० हजार रुपयांवर दर; जाणून घ्या सविस्तर
Web Title: Breaking! Extended limit of stock limit on Turi till ‘this’ date; Direct rate impact
By