ताज्या बातम्या

Tulsi Vivah | जाणून घ्या कधी आहे ;तुळशी विवाह शुभ मुहूर्त, उपाय आणि महत्त्व सविस्तर …

Tulsi Vivah | Know when is Tulsi marriage auspicious time, solution and importance in detail...

Tulsi Vivah | कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी तुळशीचं लग्न भगवान शालिग्राम यांच्याशी लावलं जातं. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जाते. (Tulsi Vivah) तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त

यावर्षी तुळशी विवाह शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 11:43 ते दुपारी 12:26 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. याव्यतिरिक्त, दुपारी 1:54 ते दुपारी 2:38 ही तुळशी विवाहासाठी चांगली वेळ मानली जाते.

तुळशी विवाहाचे उपाय

लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर तुळशीच्या लग्नाला उपाय करण्याचा सल्लाज्योतिषांनी दिला आहे.

वाचा : Diwali Lights | दिवाळीनंतर दिव्यांचे काय करावे? असे करा घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल! जाणून घ्या सविस्तर …

  • तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी. ही चुनरी दुसऱ्या दिवशी सांभाळून ठेवावी. असं केल्यास तुळशीच्या आशीर्वादाने अनुरूप जोडीदार मिळेल.
  • अख्ख्या हळदीची गाठ, केशर, गुळ आणि चना डाळ एका पिवळ्या कापडात बांधून ते विष्णू मंदिरात अर्पण करावं. यामुळे लवकरच विवाह योग जुळण्याची शक्यता असते.
  • अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. पूजेनंतर हे साहित्य सौभाग्यवती स्रीला दान करावे. असं केल्यास दाम्पत्य जीवनात सुख येतं आणि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढतं.

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाह हा एक पवित्र विधी आहे. या दिवशी तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानलं जातं. यामुळे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी तुळशी विवाह केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसंच, दाम्पत्य जीवनात सुख-समृद्धी नांदते.

हेही वाचा :

Web Title : Tulsi Vivah | Know when is Tulsi marriage auspicious time, solution and importance in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button